बीड ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत मौजे केतुरा गावातील विदयार्थी विवेक कल्याण रहाडे यांचे आत्महत्या प्रकरणात अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल

Beed

बीड ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत मौजे केतुरा गावातील विदयार्थी विवेक कल्याण रहाडे यांचे आत्महत्या प्रकरणात अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल 

बीड/प्रतिनिधी 

दिनांक ३०/०९/२०२० रोजी बीड जिल्हयात बीड ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत मौजे केतुरा येथील विदयार्थी विवेक कल्याण रहाडे वय १८ वर्ष याने स्वत : चे शेतात गळफास घेवुन आत्महत्या केली . त्याअनुशंगाने पो.स्टे . बीड ग्रामीण येथे अ.म.नंबर ३६/२०२० कलम १७४ CrPC प्रमाणे दाखल आहे . या घटनेचे गांर्भीय लक्षात घेवुन पो.स्टे.चे अधिकारी व कर्मचारी ताबडतोब घटनास्थळावर गेले व घटनास्थळ पंचनाम , ईनक्वेस्ट पंचनामा केला व मयताचे अंगवारील कपडयाची त्यांचे नातेवाईका समक्ष तपासणी केली तसेच घटनास्थळाचे आजुबाजुचा परीसर तपासला त्यावेळी काहीही आक्षेपाहार्य मिळुन आलेले नाही . त्यानंतर प्रेताचे वैदयकीय अधिकारी सरकारी दवाखाना बीड यांनी P.M. करुण मृत्युचे कारण Death by asphyxia due to hanging असा अभिप्राय दिला आहे . या दरत्यान सोशल मिडीयावर कोणीतरी अज्ञात इसमाने खोडसाळ पणाने मयताचे रजिस्टर मधिल चिट्टी पोलीसांसमोर न आनता सोशल मिडीयावर प्रसारीत केली . त्याबाबत पोलीसांनी आधिक तपसा केले असता असे निदर्शनास आले की , मयताच्या घरातील जप्त रजिस्टरच्या एका पानांवर असा मजकुर लिहला होता की , मी विवेक कल्याण रहाडे एक कष्टकरी आणि गरीब शेतकयाचा मुलगा आहे . मला जिवनात खुप मोठ होण्याची ईच्छा आहे . मी अत्ताच निट ही मेडीकलची परीक्षा दिलेली आहे . माझा निट मध्ये मराठा आरक्षण गेल्यामुळे नंबर लागत नाही माझे घरच्याची मला प्रायव्हेट मध्ये शिकवण्याची ऐपत नाही . त्यामुळे मी माझे आयुष्य संपवत आहे . मी मेल्यानंतर तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी मराठ्यांच्या मुलाची किव येईल आणि माझे मरण सार्थक होईल .. अशा आशयाची चिठठी सापडली . त्यानंतर पोलीसांनी पुढील तपासात मयताने ज्या शाळा कॉलेज मध्ये शिक्षण घेतले त्या ठिकाणावरुण त्याने लिहलेल्या उत्तर पत्रिक हस्तगत केल्या व हस्ताक्षर तज्ञाकडे हस्ताक्षराचे परीक्षण करण्यासाठी उत्तरपत्रिका व सुसाईटनोट पाठविण्यात आल्या . त्यात सुसाईट नोट चिठ्ठीतील हस्ताक्षर व मयताच्या उत्तर पत्रिकेतील नैसर्गिक हस्ताक्षर जुळत नाहीत . असे प्रमाणपत्र हस्ताक्षर तज्ञांनी दिले आहे . या घटनेला वेगळे स्वरुप देण्याचे दुष्ट हेतुने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मयत वापरत असलेल्या रजिस्टरमध्ये यातील वरील नमुद मजकुर लिहुण तो मयताने लिहीला आहे असा समड़ा निर्माण व्हावा म्हणुन बनावट दस्ताऐवज तयार केला . तो दस्ताऐवज मयताने लिहलेला त्याला माहीती असत देखील त्याने कपटीपणाने व अप्रमाणिक पणाने तो मजकुर खरा असल्याचे भासवून खोटा मजकुर सोशल मिडीयावर सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने प्रसारीत केल्याचे निष्पन्न झाले आहे . सदर प्रकरणी पोलीस स्टशेन बीड ग्रामीण येथे अज्ञात आरोपी विरुध्द गुरनं ३१६/२०२० कलम ४६५,४७१ , ५०५ ( ब ) , ३४ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदर अ.म. व गुन्हा दोन्हींचा तपास योग्य मार्गाने करण्यात येत आहे .

Sharing

Visitor Counter