संचारबंदी नियमाची पायमल्ली करणार्यावर सक्त करवाई

बीड/प्रतिनिधी
पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी संचार बंदीच्या काळात जिल्ह्यात आवेध धंदे,संचारबंदीत संधीचा फायदा घेऊन लोकांची फसवणूक करणारे, संचार बंदीच्या नियमांचे उल्लंघन करणारे, विनाकारण रस्त्यावर फिरणारे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्ह्यात पोलिस यंत्रणेला दिलेले आहे.
आज दिनांक १३ एप्रिल रोजी सकाळी ७ ते ९:३० वाजेपर्यंत संचारबंदी शीतलीकरण असताना लोक मोठ्या प्रमाणावर दुचाकी आणि चार चाकी वाहने घेऊन घराबाहेर पडून रस्त्यावर गर्दी करत होते. संचारबंदी शीतलीकरण कालावधीत नागरिकांनी दुचाकी घेऊन घराबाहेर न पडता पायी चालत जाऊन जवळच्या भागातून अत्यावश्यक सेवा प्राप्त कराव्यात असे अपेक्षित आहे.आणि याच कारणास्तव अत्यावश्यक सेवा देणारे वाहने वगळता इतर वाहनांना बीड जिल्ह्यात इंधन देणेबाबत पेट्रोल पंप चालकांना सक्त मनाई करण्यात आले आहे.
अशाप्रकारे नियम जिल्हाधिकारी बीड यांच्याकडून पूर्ण जिल्ह्यात लागू आहेत तरी या नियमाची पायमल्ली करत नागरिक संचारबंदी शितलीकरण कालावधीत मोठ्या प्रमाणात वाहनांचा वापर करुन विशिष्ट भागात गर्दी करत आहेत. त्यामुळे आज सकाळी ७ ते ९:३० या संचारबंदी शीतलीकरण कालावधीत बीड वाहतूक पोलिसांनी साठे चौक, शिवाजी चौक,नगर नाका, बीड शहर पोलीस ठाणे समोर, शिवाजीनगर पोलीस ठाणे समोर, याठिकाणी बीड शहरातील एकूण ४४० वाहने ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली.
वरील कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनातून बीड वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक राजीव तळेकर आणि सर्व वाहतूक पोलीस कर्मचारी या टीमने केली आहे.
