8 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर गोदावरी नदीपात्रात सापडला

Beed

8 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर गोदावरी नदीपात्रात सापडला

अंबड/भागवत गावंडे 

अंबड तालुक्यातील शहागड येथील गोदावरी नदीत उडी मारुन आठ दिवसापासुन बेपत्ता झालेल्या तरूणाचा मृतदेह गोदावरी नदीपात्रात आढळला आहे. दिपक वलेकर असे या तरुणाचे नाव आहे.
शहागड येथे आठवडाभरापुर्वी मंगळवारी पहाटे दिपक वलेकर (वय 22) या तरुणांने शहागड येथील वाहतुकीसाठी बंद असलेला जुन्या पुलावरण दुचाकी व मोबाईलच्या स्टेटसवर मित्राचे फोटो ठेवून गोदापात्रात उडी घेतली होती. त्याच्या शोध मोहीमसाठी नातेवाईक,नागरिक व अग्निशमन दलाच्या पथकाने होडीच्या सहाय्याने गोदावरी नदीपात्रात शोध घेत होते.यावेळी अंबड तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी भेट देवुन अग्निशमाक यंणत्रेणाला शोध कार्य ठेवण्याचे आदेश दिले.परंतु पावसामुळे गोदापात्रात जास्त जायकवाडी धरणातून पाणी सोडल्याने दिपक सापडत नव्हता. अग्निशमन दलाच्या टिमने शोध मोहीम सुरूच ठेवले होते.  दरम्यान दिपक वलेकर हा तरुण पुणे येथे असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. या तरूणाचा मृतदेह पाथरवाला -गोंदी शिवारात गोदावरी नदीपात्रातील पाणी कमी झाल्याने तसेच मासेमारीसाठी गेलेल्या काही लोकांना नदीकाठी कडेला बाभळीत तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक रतदिप जोगदंड, उपनिरीक्षक हनुमंत वारेसह आदींनी मंगळवारी रात्री नदीपात्रात तरंगत असलेला मृतदेह 2.30 वाजेच्या सुमारास बाहेर काढला. हातातील कडा, कपडेसह नातेवाईक व आईने दिपकचा चेहरा पाहून दिपक वलेकर या तरुणांची ओळख पटलेली असून बुधवारी सकाळी शहागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून दिपक वलेकर याचा मृतदेह ताब्यात दिला. बुधवारी दुपारी शोकाकुल वातावरणात दिपक यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Sharing

Visitor Counter