तहसीलच्या प्रवेशद्वारावर पिंपळाचे सात ते आठ फुटाच्या झाडांचा वेढा; इमारतीला मोठा तडा तहसील प्रशासनाचे दुर्लक्ष!

Beed

तहसीलच्या प्रवेशद्वारावर पिंपळाचे सात ते आठ फुटाच्या  झाडांचा वेढा; इमारतीला मोठा तडा तहसील प्रशासनाचे दुर्लक्ष!

किल्ले धारूर /प्रतिनिधी

किल्ले धारूर येथील तहसील प्रवेशद्वारावर चक्क पिंपळाचे 7 फुटाचे झाड आले असून त्यामुळे इमारतीला तडे गेले असून तहसील प्रशासनाचे पुरते दुर्लक्ष आहे असे निदर्शनास दिसून येते.
तहसील कार्यालयाच्या इमारती वर चक्क 7 फुटांचे पिंपळाचे झाड उगवले असून त्याकडे कोणीही लक्ष देत नसून यामुळे तहसील कार्यालयाला मोठे चिर गेली आहे असेच जर हे झाड आणकीन काही दिवस इमारती वर ठेवले तर काही दिवसातच तहसील ची इमारत जमीनदोस्त होईल यात शंका नाही,तसेच तहसील च्या परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे उगवले आहेत व मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे अशी मागणी राजमुद्रा सामाजिक संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष महेश आलाट यांनी केली आहे.

Sharing

Visitor Counter