औरंगाबाद मध्ये रुग्ण संख्या 546 वर आणखी 38 पॉझिटिव मागील तीन दिवसात 168 गंभीर!

औरंगाबाद मध्ये रुग्ण संख्या 546 वर आणखी 38 पॉझिटिव मागील तीन दिवसात 168 गंभीर!
औरंगाबाद प्रतिनिधी/सिद्धांत कांबळे
रविवारी सकाळी ३८ रुग्णांची भर पडल्याने ५०८ वरून एकूण बधितांची संख्या ५४६ झाली आहे अशी माहिती जिल्हा शल्चिकित्सक डॉक्टर सुंदर कुलकर्णी यांनी दिले. मागील तीन दिवसात शहरात शुक्रवारी १००, शनिवारी ३० आणि रविवारी ३८ अशा १६८ रुग्णांची भर पडल्याने शहरवासीयांनी मध्ये चिंतेचे वातावरण आहे. रविवारी सकाळी शहरातील दत्तनगर १, चंपा चौक ५, रामनगर १५ या भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळले अशी माहिती जिल्हा श्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली. तसेच रामनगर ४, रोहिदास नगर २, संजय नगर १, सिल्क मिल कॉलनी ८, वसुंधरा कॉलनी एन ७ सिडको, एमआयटी कॉलेज बीड बायपास येथील प्रत्येकी एक्झाम पॉझिटिव्ह असल्याचे घाटी रुग्णालयाचे समन्वयक डॉ. अरविंदगायकवाड यांनी सांगितले. यामुळे रुग्णांची संख्या ३८ ने वाढली असून शहरातील एकूण रुग्णसंख्या ५४६ वर गेली आहे. दरम्यान, शहरात शुक्रवारी दिवसभरात १०० रुग्णाची विक्रमी वार झाल्यावर शनिवारी सकाळी १७, दुपारचा सत्रात १३ आशा दिवसभरात ३० पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडून बांधीत रुग्णाची संख्या ५०८ वर गेली. शनिवारी सकाळी संजय नगर मुकुंदवाडी ६, असिया कॉलनी १, कटकट गेट २, या जुन्या भागांसह बाबर कॉलनी ४, भवानीनगर जुना मोंढा २, सिल्क मिल कॉलनी व रामनगर येथील प्रत्येकी एक अशी १७ रुग्ण आढळून झाली.रुग्ण आढळून आली.यात १७ रुग्णांत १० महिलांसह ७ पुरुषांचा समावेश आहे. दुपारी आढळला तिघांत सातारा परिसरातील ५० वर्षीय पुरुष, पंचक कुवा कीलेअर्क येथील ३५ वर्षीय महिला, जुना बाजार येथील ७५ वर्षीय वृद्ध यांचा समावेश आहे. तर त्यामुळे आढळून आलेल्या दहा रुग्णांमध्ये गंगापूर मधील १ आणि पुंडलिक नगर येथील ९ जणांचा समावेश आहे. यामुळे शनिवारी दिवस घरात एकूण ३० रुग्णांची भर एकूण रुग्ण संख्या ५०८ वर गेली आहे. वाढलेली रुग्ण संख्या आणि नवीन भागात रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.








