विनापरवाना गावात आलेल्या सहा कामगारांवर गुन्हा दाखल

विनापरवाना गावात आलेल्या सहा कामगारांवर गुन्हा दाखल
आष्टी/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज
जिल्हा प्रवेश बंदी असतानाही आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथे बाहेरगावी असलेले सहा कामगार विनापरवाना छुप्या मार्गाने व चेकपोस्ट चुकवुन आणि कसलीही वैद्यकीय तपासणी न करता गावात आल्याने त्यांच्यावर आष्टी पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने जिल्हाप्रवेश बंदी केली आहे. शासनाची रितशीर परवानगी घेऊन व वैद्यकीय तपासणी करून प्रवेश करता येतो . परंतु आष्टी तालुक्यातील टाकळी (अमिया) येथील सहा हमाल श्रीरामपुर येथील अशोकनगर सहकारी साखर कारखान्यावर हमाली करण्यासाठी गेले होते. परत गांवी येताना त्यांनी त्या कारखान्याची रितसर परवानगी घेतली नाही. तसेच वैद्यकीय तपासणी केली नाही. टाकळी गावाकडे येताना सर्व चेकपोस्ट चुकवुन छुप्या मार्गाने गावात प्रवेश करुन घरात कुटुंबासमवेत राहु लागले. याप्रकरणी जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन करुन बीड जिल्ह्यात प्रवेश केला. गावातील इतर लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते या कारणांमुळे ग्रामसेविका नाईक यांच्या फिर्यादीवरून टाकळी अमिया येथील शेंडगे वस्तीवरील सहा जणांवर कलम १८८, २६९,२७० भादंवी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








