भगवानबाबा संस्थेकडून गरीब कुटूंबांना मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतही दिले योगदान

Beed

बीड/प्रतिनिधी

सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असलेल्या ताडसोन्ना येथील श्री भगवानबाबा सेवाभावी संस्थेने कोरोना संकटातही गरीब, वंचितांना मदतीचा हात दिला. ताडसोन्ना व परिसरातील गरीब कुटूंबांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्याबरोबरच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतही अकरा हजार रुपयांचे योगदान दिल्याचे संस्थेचे सचिव महादेव मुंडे यांनी सांगितले.

कोरोना संकटामुळे सध्या मजुर, कामगारांच्या हातचे काम बंद झाले आहे. त्यांच्यासमोर आर्थिक संकट निर्माण झाले असून अशा संकटाच्या काळात मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन केले जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनीही सेवाभावी संस्था, संघटनांना आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत ताडसोन्ना येथील श्री भगवानबाबा सेवाभावी संस्थेच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय ताडसोन्ना व बीड येथील माऊली नर्सिंग कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने ताडसोन्ना व परिसरातील 125 गरजवंत कुटूंबांना पंधरा दिवस पुरेल एव्हढे जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. याबरोबरच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतही अकरा हजार रुपयांचे योगदान देण्यात आली आहे. या उपक्रमासाठी संस्थेचे सचिव महादेवजी मुंडे, संस्थेच्या सदस्या प्रा.सौ.संगीता महादेव मुंडे यांनी योगदान दिले. श्री भगवानबाबा सेवाभावी संस्थेच्या या उपक्रमाबद्दल ताडसोन्ना येथील पोलिस पाटील बंकटआबा माने, माजी सरपंच बालासाहेब मुंडे, प्राचार्य सुधाकर मुंडे, दत्ता माने पाटील, वचिष्ट मुंडे, आत्माराम मुंडे, अरुण राऊत, महादेव माने, गोरख मुंडे, निसार काका, सुशांत मुंडे आदिंनी कौतुक करत आभार व्यक्त केले आहेत.

Sharing

Visitor Counter