तहसीलदार नीलिमा थेऊरकर यांच्या उपस्थितीत गोपीनाथजी मुंडे सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने गरजूंना किराणा सामानाचे वाटप

Ashti

तहसीलदार नीलिमा थेऊरकर यांच्या उपस्थितीत गोपीनाथजी मुंडे सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने गरजूंना किराणा सामानाचे वाटप

आष्टी/तुकाराम गणगे.
   बीड प्रसार न्युज.

 कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर मात करण्यासाठी देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा करुन जवळपास एक महिना पेक्षा जास्त दिवस झाले आहेत. त्यामुळे देशातील काही राज्य, जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता उद्योग धंदे, दुकाने, बाजारपेठा ठप्प असल्याने हातावर पोट असणारे व मोलमंजुरीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांना हाताला काम नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. याचे गांभीर्य लक्षात घेवून लोकनेत्या पंकजा मुंडे, लोकप्रिय खा.डॉ. प्रितम मुंडे यांच्या प्रेरणेने गोपीनाथजी मुंडे प्रतिष्ठान व गोपीनाथजी मुंडे सार्वजनिक गणेश मंडळ आष्टी यांच्या वतीने समाजसेवक विजय गोल्हार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील बीडसांगवी येथे दि.२७एप्रिल रोजी तहसीलदार नीलिमा थेऊरकर व  मा. जि. अध्यक्षा सविता गोल्हार यांच्या हस्ते २१०गोरगरीब कुटुंबांना किराणा मालाचे वाटप करण्यात आले.
 कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रोजंदारीवर काम करणारे नागरिक घरातच बसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या चिंतेत अनेक कुटुंब आहेत. देशभरात असलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असेलेले कुटुंब, शेतमजूर, रोजंदारी कामगार यांचे अतोनात हाल होत असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा २१० कुटुंबाना समाजसेवक विजय गोल्हार यांनी किराणा सामानाचे वाटप करुन मदतीचा हात दिला आहे. यावेळी तहसीलदार नीलिमा थेऊरकर, माजी जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार गोल्हार, कमलेश नरोडे आदी उपस्थित होते. अनेक गरजूंना किराणा साहित्य मिळाल्याने लाभार्थींनी गोल्हार परिवाराचे आभार मानले.

Sharing

Visitor Counter