तहसीलदारावर हल्ला हो ऊन सुद्धा कारवाई करण्यास हो समर्थ मृत प्राय जिल्हा प्रशासनाचे गंगा पूजन करून गोड जेवण देणार-- डॉक्टर गणेश ढवळे

तहसीलदारावर हल्ला हो ऊन सुद्धा कारवाई करण्यास हो समर्थ मृत प्राय जिल्हा प्रशासनाचे गंगा पूजन करून गोड जेवण देणार-- डॉक्टर गणेश ढवळे
आष्टी ( रिपोर्टर- गोरख मोरे )
बीड जिल्ह्यातील वाळू माफिया वर कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करणारे व काही अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे धाडस दाखवले तर त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या वाळू माफिया वर मेहरबान मृतप्राय जिल्हा प्रशासनाचा गंगा पूजन कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करून गोड जेवण देण्याचा संकल्प जिल्हाधिकारी , पोलीस अधिक्षक बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री , ग्रह मंत्री , महसूल मंत्री , पोलीस महासंचालक मुंबई , विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र औरंगाबाद , विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेश कर सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिति जिल्हाध्यक्ष बीड यांनी ईमेल द्वारे कळवला आहे .
दिनांक 6 एप्रिल 2020 रोजी बीड तालुक्यातील मौजे ढोकन मोहा येथे अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने पकडताना थेट तहसीलदार शिरीष वमने यांच्या गाडीवर ट्रॅक्टर ( क्रमांक एम एच 23 एफ -1002 ) घालण्याचा प्रकार घडला , दरम्यान या प्रकरणातील गुन्हेगार मोकाटच असून तलाठी व मंडळ अधिकारी यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी नाळवंडी येथील मंडळ अधिकारी व तलाठी यांनी पिंपळनेर पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे टाळले , त्यामुळे फिर्याद घेणे क्रमप्राप्त होणार नसल्याचे सांगत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली म्हणून संबंधित प्रकरणात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी , तलाठी , मंडळ अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे तसेच ट्रॅक्टर मालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत या मागण्यासाठी डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 12/04/2021 रोजी मृत प्राय जिल्हा प्रशासनाचा प्रतीकात्मक " गंगापूजन आंदोलन " गोड जेवणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणार आहे .
मागण्या-- शिरीष वमने तहसीलदार तहसील कार्यालय बीड यांच्या गाडीवर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या ट्रॅक्टर मालक , चालक यांना तात्काळ अटक करून गुन्हा नोंदविण्यात यावा , पिंपळ नेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणे बाबत टाळाटाळ करत गैरहजर राहणारे नाळवंडी येथील मंडळ अधिकारी , तलाठी यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल तात्काळ निलंबित करण्यात यावे , बीड जिल्ह्यातील वाळू तस्करी करणारे वाहनांच्या केवळ चालका वरच नव्हे तर मालकावर गुन्हे दाखल करून नावे प्रसिद्धी माध्यमात उघड करावीत , विना नंबर प्लेट वाहने जप्त करण्यात यावीत , लॉक डाऊन कालावधीत इतर व्यावसायिकांना गर्दी च्या नावाखाली सोशल डीस्टं सिंग पाळण्यात यावा म्हणून लादलेली कडक निर्बंध वाळू तस करांसाठी लागू होत नाहीत का ? केवळ 3 ब्रास वाळू दिवसाचा वाहतूक करण्याची शासनाची परवानगी असताना दुप्पट वाळू अंधारात वाहतूक करणारा वर गुन्हे दाखल करण्यात यावेत , वाळू वाहतूक प्रकरणातील वाहनांना देणारा परवाना संबंधित संशयास्पद वातावरण असून पारदर्शकता अवलंबिण्यात यावी .