जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दहशतवादी हल्ला कार्यपध्दतीची रंगीत तालीम प्रात्यक्षिक बीड बस स्थानक घेण्यात आली

Beed

जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दहशतवादी हल्ला कार्यपध्दतीची रंगीत तालीम प्रात्यक्षिक बीड बस स्थानक घेण्यात आली

बीड /वार्ताहर

बीड जिल्हा पोलीस दलाचे वतीने आज दिनांक 13/01/2022 रोजी 10.50 ते 11.30 वा. दरम्यान बीड शहरातील बस स्थानक बीड येथे मा. पोलीस अधीक्षक सो. बीड यांचे मार्गदर्शनखाली दहशतवादी हल्लयाच्या प्रसंगी प्रसंगावधान राखुन करावयाच्या प्रमाणित कार्यपध्दतीची (SOP) प्रमाणे रंगीत तालीम घेण्यात आली. सदर ठिकाणी स्वतः अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. सचिन पांडकर यांनी भेट देवून सदरची कारवाई त्यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सदर रंगीत तालीम ( Mock Drill) दरम्यान बस स्थानक बीड येथील प्रवासी दलानाचे आवारात लोकांचे गर्दीमध्ये (04) अतिरेकी बॅग व शस्त्रासह असल्याचे व त्यांनी अंधाधुंद गोळीबार केल्याची माहिती तेथील नागरिकांकडून पोलीस नियंत्रण कक्ष बीड यांना 10.50 वा. प्राप्त झाली. त्यानंतर पोलीस नियंत्रण कक्ष बीड यांनी सदरची माहिती मा. पोलीस अधीक्षक सो. बीड यांना देवून त्यांचे मार्गदर्शनाखाली दहशतवादी हल्ला विरोधी कारवाई चे अनुषंगाने संबंधित दहशतवाद विरोधी शाखा बीड, जलद प्रतिसाद पथक, दंगल विरोधी पथक, बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक, अंगुली मुद्रा व तपासणी पथक, स्थानिक पोलीस स्टेशन, जिल्हा रुग्णालय बीड, फायर ब्रिगेड व्हॅन अधिकारी व कर्मचारी यांना माहिती देवून घटनास्थळी पाचारण केले.

सदरच्या माहितीच्या अनुषंगाने तात्काळ दहशतवाद विरोधी शाखा, जलद प्रतिसाद पथक, दंगल विरोधी पथक यांनी आप-आपले अधिकारी व अंमलदार शस्त्र व सुरक्षा साहित्यासह बीड बस्थानक मध्ये वेगवेगळया पथकासह, वेगवेगळया मार्गाने प्रवेश केला व संपुर्ण बसस्थानकास घेराव घालुन बस स्थानकातील संशयीत अतिरेकी जे चेहऱ्यास काळ्या कपडयाने बांधून पाठीवर बॅग अडकावून स्वत:कडील शस्त्राने अंधाधुंद गोळीबार करत होता त्यांना पकडून त्यांचेकडून त्यांचे शस्त्र व साहित्य ताब्यात घेण्यात आले.

त्यानंतर बॉम्ब शोधक पथक व श्वान पथकाचे सहायाने सदर बॅगची व परिसराची तपासणी केली. त्यानंतर फॉरेसिंक टिमच्या वतीने देखील घटनास्थळाची व वस्तूची पाहणी करुन तपासणी केली. त्यानंतर बस स्थानाकातील सर्व प्रवाशी यांना सदर घटनेच्या अनुषंगाने सर्व परस्थिती ही पोलीसांच्या नियंत्रणात असुन कोणीही नागरिकांनी भयभीत होवू नये व सदरची कार्यवाही रंगीत तालीमचे प्रात्यक्षिक असले बाबत स्पिकरद्वारे सुचना देवून कळविले.

सदरची दहशतवाद हल्ल्याप्रसंगी करावयाच्या कार्यपध्दतीची रंगीत तालीम (Mock Drill) मध्ये मा.पोलीस अधीक्षक बीड यांचे मार्गदर्शनाखाली, दहशतवाद विरोधी शाखा बीड, जलद प्रतिसाद पथक, दंगल विरोधी पथक, बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक, अंगुली मुद्रा व तपासणी पथक, स्थानिक पोलीस स्टेशन, शहर वाहतूक शाखेचे सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार, जिल्हा रुग्णालय बीड, फायर ब्रिगेड व्हॅन येथील अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला.

Sharing

Visitor Counter