महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचा यशस्वी पाठपुरावा

महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचा यशस्वी पाठपुरावा
अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी: मागण्या मान्य
बीड/प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षापासून जि.प. उर्दू शिक्षकांच्या अनेक प्रलंबित प्रश्न व प्रमुख मागण्या जिल्हा परिषद स्तरावर प्रलंबित होत्या. तसेच जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध समस्या व मते मागविण्यात आले
होत्या. या अनुषंगाने शासन मान्य आणि जिल्ह्यात सक्रिय संघटना महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना बीड यांनी पुढाकार घेऊन या विषयी यशस्वी पाठपुरावा केला आणि अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावून विविध मागण्या मान्य करून घेतले.
जि.प. उर्दू शिक्षकांच्या विविध समस्या व प्रमुख मागण्या संदर्भात जिल्हा परिषद बीड येथे गेल्या दोन महिन्या पूर्वी जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने संघटनेची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, उपशिक्षणाधिकारी कराड व सहाय्यक प्रशासन अधिकारी खेडकर व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत विविध समस्या निकाली काढून मागण्या मान्य करण्यात येईल असे जिल्हा परिषद कडून आश्वासन देण्यात आले होते मात्र तोंडी आश्वासन नको मंजुरीचे लेखी पत्रक देण्यात यावे अशी संघटनेची ठाम मागणी होती. संघटनेच्या यशस्वी पाठपुरावा नंतर या संदर्भात जिल्हा परिषद शिक्षण विभागकडून आखिर मागण्या मंजुरीचे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. सदरील परिपत्रक निघाल्यावर कोणत्या मागण्या मान्य करण्यात आले हे स्पष्ट झाले आहे. शिक्षण क्षेत्रात शाळा आणि शिक्षकांसाठी महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे कार्य कौतुकास्पद आहे हेही स्पष्ट झाले आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष माजेद अहमद, सचिव शेख युनूस, कार्याध्यक्ष जफर खान, कोषाध्यक्ष सय्यद रहीम, उपाध्यक्ष सय्यद रिजवान, मिर्झा अजमत बेग, सहसचिव शेख कलीम, संघटक नजीब सौदागर, मसूद इकबाल, कादरी नुरुल इस्लाम व सर्व टीमने यासाठी पाठपुरावा केले.
गतीने निकाली काढण्यात येईल.शासन निर्णयानुसार गोपनीय अहवालाची एक प्रत शिक्षकांना देण्यात येईल.धारूर तालुक्यात उर्दू माध्यमाची प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी सकारात्मक विचार करण्यात येईल. गेवराई तालुक्यातील जि.प. उर्दू प्रा. शाळा तलवडा या शाळेला इमारत नाही तरी शाळा इमारत बांधकामासाठी डी.पी.डी. योजने अंतर्गत तरतूद करण्यात येईल.जिल्ह्यात जीर्णो धोकादायक इमारत पाडून त्या जागी नवीन इमारत बांधकामासाठी राजमाता जिजाऊ योजनेअंतर्गत नवीन इमारत बांधकामे पूर्ण करण्यात येईल.गेवराई तालुक्यातील उर्दू तय्यबनगर शाळेस सातवीचे वर्ग जोडणेसाठी प्रशासकीय व ऑनलाईन कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल.तसेच 1072 प्राथमिक पदवीधर शिक्षकांचे प्रकरणे न्याय प्रविष्ट असल्याने न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर पुढील दर्जावढ व पदोन्नतीची प्रकिया पूर्ण करण्यात येईल.








