जमियत तर्फे कर्तव्यावर तैनात पोलीसांची जेवणाची व्यवस्था

Beed

जमियत तर्फे कर्तव्यावर तैनात पोलीसांची जेवणाची व्यवस्था 

नेकनुर/प्रतिनिधी 

संपूर्ण राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक लाॅकडाऊन लागु करून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याचा सर्वात जास्त ताण पोलीस प्रशासनावर असुन बीड तालुक्यातील नेकनूर येथील पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी स.पो. नि. लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पोलीस ठाणे  हद्दीतील पोलीस बंदोबस्त तैनात करुन ज्या ठिकाणी प्रेमाने होईल त्या ठिकाणी प्रेमाने ज्या ठिकाणी पोलीसी खाक्या दाखवून नागरिकांना कडक नियमांचे पालन करण्यास भाग पाडले आहे. याकामी बंदोबस्तासाठी बाहेरून आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची सर्व बंद असल्याने जेवणाची गैरसोय होत होती. या गोष्टीचा विचार करून जमियत उलेमा ए हिंद नेकनुर शाखेच्या वतीने पोलीस बांधवांची जेवणाची व्यवस्था नुरानी मस्जीद येथे करण्यात आली आहे. 

जमियत उलेमा ए हिंदचे बीड जिल्हा जनरल सेक्रेटरी मौलाना सय्यद साबेर अली रशीदी यांच्या नेतृत्वाखाली हे नियोजन करण्यात आले असून बंदोबस्त वर तैनात असलेल्या पोलीस बांधवांची शाकाहारी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. या वेळी स. पो. नि. लक्ष्मण केंद्रे, मौलाना सय्यद साबेर अली रशीदी, हाफेज शेख वाजेद, शेख हिदायत उल्ला आदी उपस्थित होते. या वेळी पोलीस बांधवांनी जमियत च्या या उपक्रमाचे अभिनंदन केले आहे.

Sharing

Visitor Counter