ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा कामात हलगर्जीपणा ;वेळेचे भान राहिले नाही.-- आरोग्य विभागाचा ढीसाळ कारभार

Beed

ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा कामात हलगर्जीपणा ;वेळेचे भान राहिले नाही.-- आरोग्य विभागाचा ढीसाळ कारभार---

किल्लेधारुर (प्रतिनिधी)

शहरात ग्रामीण रुग्णालयांमध्ये आज सोमवारी लहान बालकांना ढोस घेण्याकरिता एक-दीड तास ताटकळत वाट बघावे लागली. रुग्णालयातील नर्स साडेदहा वाजता रुग्णालय येथे आले असता त्या मोबाईलवरच व्यस्त होत्या पंधरा-वीस मिनिटा नंतर त्यांनी बालकांना ढोस देण्यास सुरुवात केली.ढोस देत असताना त्यांचा मोबाईल चालू होता यामध्ये आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा उघडकीस आला. प्रत्येक सोमवारी लहान बालकांना ढोस दिले जातात. ग्रामीण रुग्णालय येथे आलेल्या मातांनी आरोग्य विभागा बद्दल संताप व्यक्त करत आरोग्य कर्मचाऱ्यांवर कोणाचा धाक राहिला का नाही असा प्रश्न पडला आहे.

ग्रामीण रुग्णालयामध्ये सोमवारचा लहान बाळांचा ढोस घेण्यासाठी ताटकळत तासन-तास वाट पहावे लगत आहे.नर्स उशिरा येऊन नर्सने समोरील काम सोडून फोनवर जास्त वेळ दिल्याने ढोस घेण्यासाठी ताटकळत बसावे लागले.अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई होईल का? या रुग्णालयाचा कारभार सुधारण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी माता 
अंजना गायसमुद्रे.यांनी केली आहे.

Sharing

Visitor Counter