नकारात्मक काळात सकारात्मक विचार गरजेचा-माधुरी घुमरे

Beed

नकारात्मक काळात सकारात्मक विचार गरजेचा-माधुरी घुमरे

बीड/प्रतिनिधी  

कोराेनाला घाबरून घरात बसून काहीच होणार नाही आपल्याला त्यांच्याशी सामना करावाच लागेल .महाराष्ट्रात दुसरी लाट चालू आहे विशेषकरून ग्रामीण भागात काेराेनाचे प्रमाण जास्त वाढले आहे व तिसरी लाट येणार असल्याचे सांगितले जात आहे .म्हणून कोणीतरी पॉझिटिव्ह  बोलणं गरजेचं आहे तसं; आवाहन करणं गरजेचं आहे जसं की; आपण वाईट बातमी पटकन उचलतो सगळीकडे पसरवतो तसेच चांगली बाजूसुद्धा सांगू शकतो, तरीपण एखाद्याला खोटी अशा देणं वाईट आहे.अशासुद्धा चांगली असते हे आपल्याला माहीत आहे जर कदाचित तुम्हाला निराशा आली आणि त्या निराश्यामुळे तुमच्या  Antibodies कमी झाल्या आणि तसं झाल्यामुळे
 तुम्हाला काेरोना झाला.व पुन्हा  तुम्ही निराश झाला हे चक्र असंच चालू राहतं त्याच्यामुळे निराशाचा विचार नाही करायचा जसे की; एखाद्याने दोन डोस Covaxin किंवा Covishield  घेतले तरी त्या व्यक्तीला कोरोना झाला मग ती बातमी आपल्यापर्यंत अशी पोहोचते की बोंब होते .मग बातमी
( न्यूज ) कशी पाहिजे   मला किंवा त्या व्यक्तीला काेरोना झाला होता मात्र  लस चा डोस घेतल्यामुळे (सिरियस) जास्त प्रमाणात करोना झाला नाही .जी लस  उपलब्ध आहे ती घेऊन काेराेनावर मात करायची बाकीच्या देशात जसा कोरोना कमी झाला तसा आपल्या देशातदेखील कमी होणार आपण आपली काळजी घेऊ प्रशासनाला सहकार्य करू .काेराेना न्यूजचा उपवास करू म्हणजे? काेराेनाच्या बातम्या न बघता आपआपले छंद जाेपासू , इच्छाशक्ती आणि सकारात्मक विचारांच्या जोरावर आपण सर्व जण या महामारीवर  मात करू 
   साै. माधुरी घुमरे राष्ट्र. कॉं.महिला शहराध्यक्ष बीड

Sharing

Visitor Counter