मोमीन अब्दुल अजीम आसीम चे एमबीए परीक्षेत अलौकिक यश  

Beed

मोमीन अब्दुल अजीम आसीम चे एमबीए परीक्षेत अलौकिक यश  

बीड/प्रतिनिधी

येथील मोमीन अब्दुल अजीम असीम याने एमबीएच्या अंतिम वर्षात ८०.१९ टक्के गुण घेऊन अलौकिक यश संपादन केले असून त्याचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

          बीड शहरातील कारंजा रोड स्थित कापड दुकान (अब्दुल मोईज़ कैसर) चे व्यापारी अब्दुल अलीम अखील यांचा गुणवंत मुलगा मोमीन अब्दुल अजीम असीम याने यापूर्वी इयत्ता दहावी व बारावी प्रमाणेच एमबीएच्या अंतिम वर्षात पुणे येथील नामवंत महाविद्यालय एमसीई सोसायटी एलाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस मध्ये एप्रिल २०२२ ला घेण्यात आलेल्या एमबीए परीक्षेत अलौकिक यश मिळविले असून या परीक्षेचे नुकतेच जाहीर झालेल्या निकालामध्ये अब्दुल अजीम आसीम ला एकूण ३२०० पैकी २५६६ गुण मिळाले असून याची टक्केवारी ८०.१९ आहे. त्याच्यात असलेल्या विशेष प्राविण्‍यामुळे त्याला हे अलौकिक यश संपादन करता आले आहे. या यशाबद्दल त्याचे नातेवाईक, मित्र व परिवाराकडून अभिनंदन होत असून त्याच्यावर या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Sharing

Visitor Counter