के.एस.के महाविद्यालय बीड "येथे विशेष शिबीरामार्फ़त बीड तालुक्यातील महाविद्यालयाचे स्विकारले जाणार जात वैधता प्रस्ताव”

के.एस.के महाविद्यालय बीड "येथे विशेष शिबीरामार्फ़त बीड तालुक्यातील महाविद्यालयाचे स्विकारले जाणार जात वैधता प्रस्ताव”
बीड/वार्ताहर
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बीड कार्यालयाने दि.26 नोव्हेंबर 2022 ते दि.31 डिसेंबर 2022 या कालावधीत विशेष शिबिराअंतर्गत 11 वी 12 वी विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल करण्यात आलेले नाहीत अशा विद्यार्थी यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फ़त दि.23.12.20222 रोजी बीड तालुक्यातील महाविद्यालयाचे प्राचार्य,लिपिक,समान संधी केंद्राचे प्रतिनिधी यांनी कार्यालयीने वेळेत "के.एस.के महाविद्यालय बीड" ता.जि. बीड येथे समितीचे कर्मचारी, समतादुत उपस्थित राहणार असल्याने आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे परिपुर्ण प्रस्ताव सादर करावेत.सदरील प्रस्तावाची छाननी करून समिती चे कर्मचारी आपल्याला परिपूर्ण असलेल्या प्रस्तावाची पोहोच पावती देणार आहेत यामुळे विध्यार्थी यांचे जात पडताळणी प्रस्ताव तालुक्यातच स्वीकारले जाणार असून विद्यार्थ्यांना यामुळे आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान टाळता येणार आहे.जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती तर्फे विशेष शिबीर राबविण्यात येत असुन संबंधित तालुक्यातील महाविद्यालयांनी या विशेष शिबीरामध्ये जास्तीत जास्त महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे परिपुर्ण प्रस्ताव दाखल करावेत, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बीड कार्यालयाकडून कळविण्यात येत आहे.








