तरुणाईला लागले लूडो गेमचे वेड

तरुणाईला लागले लूडो गेमचे वेड
किल्लेधारुर/प्रतिनिधी
शहरात सध्या गल्लीत, कट्ट्यांवर, अंगणात अशा सार्वजनिक ठिकाणी चार तरुण टाळकी एकत्र येऊन मोबाइलमध्ये डोके घालून काही तरी करीत असतील, तर घाबरून जाऊ नका. हे तरुण काही आक्षेपार्ह गोष्टी करीत नसून स्मार्टफोनवर त्यांचा ‘लुडो’चा डाव रंगत आहे.काहीजण मनोरंजनासाठी तर काही पैसे लाऊन खेळतात एका क्लिकवर कवड्या टाकून आणि सोंगट्या फिरवून ही तरुण पोरं तासन् तास लुडोचा आनंद घेत आहेत. केवळ तरुणच नव्हे, तर आजी, आजोबा आणि नातवंडे आणि आई, बाबा यांच्यातही लुडोचा डाव चांगलाच रंगू लागला आहे.
लुडो या गेमचे खुळ सध्या शहरात वाऱ्यासारखे विविध ठिकाणी पहायला मिळत आहे धारुर शहरात असेच काही तरुण लुडो गेम खेळतांना घेतलेल छायाचित्र. जवळजवळ प्रत्येकाच्या फोनमध्ये हा गेम पाहायला मिळत असून एका वेळी जास्तीत जास्त चौघे जण या गेमचा आनंद घेऊ शकतात. थोडा मोकळा वेळ मिळाला, की लगेच गेम सुरू होतो आणि मग तासन् तास भान हरपून खेळणाऱ्यांची डोकी मोबाईल भोवती रिंगण करतात. गल्लीत, कट्ट्यांवर, अंगणात अशा सार्वजनिक ठिकाणी अशा सगळ्याच ठिकाणी ‘लुडो’च्या वेडाने जमलेली डोक्याची ही रिंगणं सध्या सगळ्यांच्याच चर्चेचा विषय ठरत आहे.