कोरोनाला हरवण्यासाठी आपले सरकार केंद्र चालकांचा लढा; आरोग्य सेतु ॲप च्या माध्यमातुन जनजागृती.

कोरोनाला हरवण्यासाठी आपले सरकार केंद्र चालकांचा लढा; आरोग्य सेतु ॲप च्या माध्यमातुन जनजागृती.
आष्टी/प्रतिनिधी.
बीड प्रसार न्युज.
कोरोना चा संसर्ग रोखण्यासाठी देशात अनेक उपाययोजना सुरू आहेत, कोरोना संकटातुन बाहेर पडण्यासाठी ग्रामपंचायतचे केंद्र चालक (संगणक परिचालक) आरोग्य सेतू ॲप च्या माध्यमातून जनजागृती करत आहेत यामध्ये आपले सरकार केंद्र चालकांचे मोठे योगदान मिळत आहे. आष्टीचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत, तालुका व्यवस्थापक यशवंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र चालक (संगणक परिचालक) कोरोनाच्या संकटाला लढा देत आहेत. जगभर कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाला हरवण्यासाठी केंद्र चालकांनी आरोग्य सेतु ॲप च्या माध्यामातुन लढा सुरु केला आहे.
लॉकडाऊन च्या सवेंदनशील परिस्थिती मध्ये सर्व शासन नियमांचे काटकोरपणे पालन करत बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील बीडसांगवी, पिंपरखेड, टाकळी (अमिया ), दौलावडगाव या गावात नागरिकांमध्ये ‘आरोग्य सेतू ‘ॲप बाबत केंद्र चालक नागरिकांना मार्गदर्शन करून नागरिकांच्या मोबाईल मध्ये हे ॲप इन्स्टॉल करून देत त्यांची वैयक्तिक नोंदणी देखील करून घेत आहेत .येथील केंद्र चालकांनी नागरिकांच्या घरोघरी जाऊन ‘आरोग्य सेतू ‘हे ॲप नागरिकांच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून दिले आहेत. बीडसांगवी येथील आण्णा नारायण गणगे यांनी ३५ नागरिकांना,पिंपरखेड येथील अशोक निवृत्ती म्हस्के यांनी ६२ नागरिकांना, दौलावडगाव येथील महादेव सर्जेराव कोहक यांनी १०३ नागरिकांना, टाकळी (अमिया) येथील लक्ष्मण सिदूराम भुकन यांनी १०३ नागरिकांना तर देवळाली येथील अशोक तुकाराम कावेदार यांनी ११० नागरिकांना आरोग्य सेतु ॲप डाऊनलोड करुन दिले आहे.
हे केंद्र चालक आरोग्य् सेतु ॲप द्वारे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावात माहिती देत असून नागरिकांना स्वतःच्या मोबाईल मध्ये आरोग्य सेतू ॲप घेण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत, कोरोनाच्या लढयात केंद्र चालक परिश्रम घेत आहेत.
गावातील नागरीकांना मार्गदर्शन करुन आरोग्य सेतू ॲप हे मोबाईल मध्ये अपलोड करत त्यात नागरिकांची नोंद देखील करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊन आरोग्य सेतू ॲप मध्ये त्यांची संपूर्ण माहिती समाविष्ट करत आहे. या ॲपच्या माध्यमातून कोविड 19 पासून नागरिकांना दूर ठेवण्यास मदत होत आहे. कोरोना पासून बचाव करण्याचे काम या ॲपद्वारे केले जात आहे.
नागरिकांच्या मोबाईल मध्ये आरोग्य सेतू ॲप इन्स्टॉल करून वेळोवेळी अपडेट घेत आहेत. कोराना संकटात जनजागृती करण्याचे काम केंद्र चालक करत आहेत. अशी माहिती तालुका व्यवस्थापक यशवंत मोरे यांनी दिली. त्यांना गटविकास अधिकारी सुधिर भागवत, व्यवस्थापक यशवंत मोरे, संबंधीत ग्रामसेवक यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे.
