जिल्हा परिषदेच्या नूतन सभागृहाला डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नाव द्यावे-सुधीर काकडे यांची मागणी

Beed

जिल्हा परिषदेच्या नूतन सभागृहाला डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नाव द्यावे-सुधीर काकडे यांची मागणी

 बीड/वार्ताहर

जिल्हा परिषद बीडच्या नवीन वास्तू मधील सभागृहाला भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात यावे अशी आग्रही मागणी शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे यांनी एका निवेदनाद्वारे  मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
    ए.पी.जे. अब्दुल कलाम हे भारताचे ११ वे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म तामिळनाडूमधील रामेश्वरम् येथे झाला होता.ते एक एरोनॉटिकल अभियांत्रिक (इंजिनिअर) होते. त्यांनी डी.आर डी.ओ. मध्ये कार्य केले व भारताच्या अग्नी-१, अग्नी-२ आणि अग्नी-३ प्रक्षेपण अस्त्रांची निर्मिती केली. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते इस्रोचे वैैज्ञानिक होते. डॉ. कलाम हे भारताच्या अंतराळ कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात सहभागी होते. या कारणास्तव त्यांना "मिसाईल मॅन" असेही म्हणतात. २००२ मध्ये कलाम हे भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले आणि ५ वर्षांच्या कार्यकाळानंतर ते शिक्षण, लेखन आणि सार्वजनिक जीवनात व्यस्त झाले.
   अशी थोर व्यक्ती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे २७ जुलै २०१५ रोजी दुःखद निधन झाले.उभे आयुष्य निस्वार्थ देशाची सेवा केलेल्या या व्यक्तीची प्रेरणा घेऊन जिल्हा परिषद बीडचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी पुढील येत्या काळात कार्य करावे तसेच सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत म्हणून जिल्हा परिषदेच्या सभाग्रहाला ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात यावे अशी आग्रही मागणी एका निवेदनाद्वारे शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे यांनी केलेलीं आहे.यावेळी त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेते सुहास पाटील,शिवसंग्रामचे बीड तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे,मा.पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर कोकाटे,ज्येष्ठ नेते योगेश शेळके,उपतालुकाध्यक्ष राजेंद्र माने, योगेश शेळके,शहर उपाध्यक्ष शेषराव तांबे, अल्पसंख्यांकचे नेते  कुतुब भाई,, जाकीर हुसेन, अमजद पठाण, शेख अजहर, अबेद भाई,नितीन बुधनर, शेख नासेर,रवी घुमरे व अन्य शिवसंग्राम चे कार्यकर्ते उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter