धारूर नगरपरिषद कार्यालयात सॅनिटाझर रूम
Dharur

धारूर/नाथा ढगे
नगर परिषद कार्यालय किल्ले धारूर येथे कार्यालयात येणारे नागरिक, कर्मचारी व सफाई कामगार यांच्या सुरक्षेसाठी अॅटोमॅटीक सॅनिटाझर रुम चा शुभारंभ करण्यात आला.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवो नये यासाठी संपूर्ण शरीराचे निर्जंतुकीकरण होणे गरजेचे आहे नगरपरिषद कार्यालयात आणेक नागरिक येतात जातात तसेच कर्मचारी , सफाई कामगार यांची संख्या मोठी आहे सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने आज नगरपरिषदेने सॅनिटाझर रूम तयार केली.
त्या प्रसंगी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा नगराध्यक्ष डॉ. स्वरुपसिंह हजारी , उपनगराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड कर्मचारी सचिन डावकर, माणिक लोखंडे उपस्थीत होते.








