मुंबई-नागपूर महामार्गावरील खोजेवाडी फाट्याजवळ घटना पीकअपमधील १९ कामगार जखमी

Beed

मुंबई-नागपूर महामार्गावरील खोजेवाडी फाट्याजवळ घटना पीकअपमधील १९ कामगार जखमी

लॉकडाउनमुळे मुंबईत अडकलेले जालना जिल्‍ह्यातील काही कामगार

औरंगाबाद/प्रतिनिधि

एका वाहनाने हूल दिल्याने पीकअप वाहन उलटून १९ कामगार जखमी झाले. ही घटना मुंबई-नागपूर महामार्गावरील खोजेवाडी फाट्याजवळ मंगळवारी (ता. १९) दुपारी दोनच्या सुमारास घडली. यात पीकअपमधील १९ कामगार जखमी झाले. हे कामगार मुंबईकडून जालन्याकडे जात होते. लॉकडाउनमुळे मुंबईत अडकलेले जालना जिल्‍ह्यातील काही कामगार कुटुंबीयांसह सोमवारी (ता. १८) रात्री बाराच्या पीकअप जीपमध्ये (एमएच ४७ ई ०७७९) बसून जालन्याला जात होते. मुंबई-नागपूर महामार्गावरील खोजेवाडी फाट्याजवळ एका वाहनाने त्यांच्या वाहनाला हूल दिली. त्यामुळे जीपचालक अंबादास वाहुळे (रा. जालना) याचा ताबा सुटला आणि जीप रस्त्यावरच उलटली.

Sharing

Visitor Counter