महाराष्ट्र राज्य अधिकारी महासंघ बैठक बुधवारी

Beed

महाराष्ट्र राज्य अधिकारी महासंघ बैठक बुधवारी

     

       बीड/वार्ताहर 

बीड जिल्ह्यातील राजपत्रित अधिकारी महासंघाच्या जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक दि. 19.01.2022 रोजी दुपारी 3 वाजता निवासी उपजिल्हाधिकारी, बीड यांचे दालनात आयोजत केली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कार्यकारिणीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी या बैठकीस उपस्थित राहणार असून, बैठकीत अधिकारी कल्याण केंद्र बांधकाम, अधिकाऱ्यांना प्रशासनात काम करताना येणाऱ्या अडीअडचणी, राजपत्रित अधिकारी महासंघ जिल्हा कार्यकारिणी पुनर्रचना, ऐनवेळचे विषय या विषयांवर चर्चा होणार आहे. असे निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, कोषागार अधिकारी दिलीप झिरपे, कोषाध्यक्ष तथा शाखा अभिंयंता सतिश देशपांडे, राज्य संघटक महाराष्ट्र राज्य पी.जी. जावळे, अप्पर कोषागार अधिकारी सतिष घोळवे यांनी कळविले आहे.

Sharing

Visitor Counter