महिला व बाल विकास मंत्रालय मार्फत देण्यात येणाऱ्या

Beed

महिला व बाल विकास मंत्रालय मार्फत देण्यात येणाऱ्या

नारी शक्ती पुरस्कार करीता ऑनलाईन प्रस्ताव मागवले

  बीड/वार्ताहर 

 केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या महिला, संस्था, ग्रामपंचायत, नगरपालिका कंपन्या, सार्वजनिक क्षेत्रातील उदयोग, इ. नारी / स्त्री शक्ती पुरस्कार दिला जाणार आहे. अर्ज /नामनिर्देशन भरण्याची अंतीम तारीख ही 31.01.2022 आहे याची ईच्छुकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, बीड यांनी केले आहे.

            शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे आहेत. व्यक्तीगत पुरस्काराकरिता पात्र इच्छुक महिलांचे दि.01.07.2021 रोजी किमान वय 25 वर्ष असावे. महिला / संस्थाना महिलांशी संबंधित क्षेत्रातील किमान 5 वर्षाचा अनुभव असावा. अर्जदाराला यापुर्वी केंद्रशासनाचे नारी शक्ती वा तत्समान पुरस्कार मिळालेले नसावे. केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महिलांसाठी विशेष  कार्य करणाऱ्या पात्र महिलांना / संस्थांना नारी शक्ती पुरस्कार दिला जाणार आहे. पात्रता व अटी व शर्ती व पुरस्काराची नियमावली निकष केंद्र शासनाचे वेबसाईट www.wcd.nic.in वर उपलब्ध आहे.  नारी शक्ती पुरस्कार  हे 08 मार्च 2022 रोजी जागतिक महिला दिनी नवी दिल्ली येथे वितरीत करण्यात येणार आहे.

            या पुरस्कारासाठी पात्र महिला व कार्यकर्त्या व स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायत, नगरपालिका, कंपन्या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, इ. यांचे कडुन ऑनलाईन पदधतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. शासन पत्रात नमुद मार्गदर्शक सुचनेनुसार नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्जदाराने, अर्ज/ नामनिर्देशन योग्य त्या कागदपत्रासह केवळ ऑनलाईन पध्दतीने केंद्रशासनाचे www.awards.gov.in या वेबसाईटवर भरावयाचे आहेत. केवळ ऑनलाईन अर्जच स्वीकारले जातील. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, बीड यांचे कार्यालय वरद प्राईड कॉम्प्लेक्स, धानोरा रोड ,बीड फोन क्र.02442230493 यांचेशी संपर्क साधावा.

Sharing

Visitor Counter