दोनहजार लीटर बायोडिझेल सह वाळूने भरलेल्या हायवावर पोलीस अधीक्षक विशेष पथकाची कारवाई

Beed

दोनहजार लीटर बायोडिझेल सह वाळूने भरलेल्या हायवावर पोलीस अधीक्षक विशेष पथकाची कारवाई

बीड/वार्ताहर 

बीड जिल्ह्यातील दररोज विशेष पथकाची कारवाई चालूच असून पोलिस - अधिक्षक आर . राजा यांच्या विशेष पथकाने पेठ बीड पोलिस ठाण्याच्या हद्दीत काल रात्री दोन ठिकाणी वेगवेगळी कारवाई केली . नाळवंडी नाका परिसरात वाळूने भरलेला हायवा पकडला असुन तेलगाव रोडवर दोन हजार लिटर बायोडिझेलसह एक पिकअप जप्त करण्यात आला आहे . एसपींच्या पथकाने अॅक्टीव्ह होत एकाच वेळी दोन ठिकाणी कारवाई केल्याने अवैद्य धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले आहेत . पेठ बीड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस अधिक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख ए . पी . आय . धोक्रट यांच्यासह अन्वर शेख , गोविंद काळे , गुलरेज दुराणी , पाटेकर यांनी एका वाळुने भरलेल्या हायवावर कारवाई केली . त्यानंतर तेलगाव रोडवर एका वाहनातुन बायोडिझेल घेवुन जात असल्याची माहिती मिळताच याच पथकाने दोन हजार लिटर बायोडिझेलसह पिकअप क्र . एम . एच . ४६ ए . आर . ७२५१ ताब्यात घेतले .

Sharing

Visitor Counter