तुषार सोनवणे यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार

तुषार सोनवणे यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार
बीड/प्रतिनिधी
आरोग्य , व्यसनमुक्ती , क्षेत्रात ऊल्लेखनिय कामगिरी बजावल्या बद्दल व्यसनमुक्ती परीषद महाराष्ट्र वतीने देण्यात येणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा सन्मान 2022 पुरस्कारा साठी त्यांची निवड झाली आहे.
दि.24 फेब्रुवारी 2022 रोजी विधान भवन सेंट्रल हॉल मुंबई येथे विधान सभा अध्यक्ष मा नरहरी झिरवाळ साहेब व सन्माननीय मंत्री महोदय व आमदार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार त्यांना दिल्या जाणार आहे .आंबेजोगाई येथील नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र वाघाळा डॉ. राजकुमार गवळे व प्रा.अंजलीताई पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तुषार सोनवणे हे समुपदेशक व जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत आहेत .अंबाजोगाईत वाघाळा ग्रामीण भागात जनजागृती व समन्वय साधुन आरोग्य विषयक प्रबोधनाचे व व्यसनमुक्तीचे काम ते करत आहेत आंबेजोगाई येथील क्रांतिज्योत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र वाघाळा येथे शेकडो रुग्ण मित्रांना व कुटुबांना समुपदेशन करून सर्व उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांच्या या कार्याची दखल व्यसनमुक्ती परिषदेने घेतली आहे ,त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल डॉ. राजकुमार गवळे,प्रा.अंजलीताई पाटील, प्रकल्प समन्वयक ओम डोलारे,संतोष राजपंखे,बलभीम कदम,गणेश गुजर,आव्हाड सर, यांच्यासह विविध स्तरातून तसेच फोन, व्हाट्सएप वरून त्यांचे अभिनंदन होत आहे.
