शेख शाकेरा यांचा शेकडो कार्यकर्त्यांसोबत सारिका ताई क्षिरसागर यांच्या उपस्थितीत जाहिर प्रवेश 

Beed

शेख शाकेरा यांचा शेकडो कार्यकर्त्यांसोबत सारिका ताई क्षिरसागर यांच्या उपस्थितीत जाहिर प्रवेश 

मुस्लिम महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार-योगेश शिरसागर

बीड/वार्ताहर 

बीड शहरातील आगामी निवडणूक लक्षात घेत शहरात वेगवेगळा बदल होताना पाहण्यास मिळत आहे काका-पुतणे यांच्या कामाला वेग आलेला हि दिसत आहे. यातच सारिका ताई शिरसागर ह्या देखील ग्राउंड लेव्हल वर उतरून महिलांना एकजूट करण्याचे काम करत असल्याचे चित्र बीड शहरात पाहण्यास मिळत आहे.आज शेख शाकेरा यांनी सारिका ताई क्षीरसागर यांच्यावर विश्वास टाकुन योगेश भैय्या क्षीरसागर व सारिका ताई शिरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत व शालिनी परदेशी,निता कांबळे व मनिषा स्वामी यांच्या उपस्थित मीना फंक्शनाल येथे जाहीर प्रवेश केला आहे.

कार्यक्रमात योगेश भैय्या क्षीरसागर यांनी बोलताना सांगितले की महिलांसाठी घरकुल राशन कार्ड संजय गांधी निराधार व महिलांसाठी हॉस्टेलची व्यवस्था करण्यात ेईल असे ठाम आश्‍वासन दिले तसेच सारिका ताई यांनीदेखील बोलताना सांगितले की बचत गटाच्या सर्व महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन व तुमच्या विश्वासाला तडा देणार नाही आसा विश्वास सारिका ताई यांनी बोलताना दिला तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड.शेख झेबा यांनी केला या कार्यक्रमाला उपस्थित यास्मिन तांबोळी,शेख रेश्मा,नुसत काजी आदींची उपस्थिती होती.

 

Sharing

Visitor Counter