सेंट अँन्स सोशल सेंटरच्या वतीने गरजु युवती व महिलांना प्रशिक्षणासाठी संगणकची भेठ

Beed

सेंट अँन्स सोशल सेंटरच्या वतीने गरजु युवती व महिलांना प्रशिक्षणासाठी संगणकची भेठ

बीड/वार्ताहर 

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये महिला सक्षमीकरण व जागतिक स्तरावरील माहिती मिळवण्यासाठी तंत्रज्ञानाची गरजेचे आहे त्या साठी पाली या गावमध्ये युवती व महिलांमध्ये सेंट अँन्स सेवा केंद्राच्या माध्यमातून वेळोवेळी महिला सक्षमीकरनावर विविध उपक्रम मागील काही वर्षा पासून राबवत आलेले आहे त्यातून महिला व युवतीमध्ये जनजागृती झाली आणि त्यांनी कॉम्पुटर ज्ञान मिळावे अशी इछा व्यक्त केली परंतु मुलीना प्रशिक्षनसाठी बीड शहरात येऊन प्रशिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नसल्यामुळे मुलींना कंम्पुटरी ज्ञान मिळवणे काठिण झाले असल्यामुळे मुलिंना शहरात पाठवण्यासाठी त्यांचे आई वडील तयार नव्हते परंतु मुलीना शिक्षणाची आवड असल्यामुळे त्यांनी त्यांची ही इछा सेंट अँन्स समाज सेवा केंद्राच्या संचालिका सिस्टर ऍनी जोसेफ यांच्याकडे व्यक्त केली. त्यानंतर मुल्लींनी सतत पाठपुरावा करत व सिस्टर ऍनी जोसेफ यांचा अथक प्रयत्नातून मुलींना कॉम्पुटर उपलब्ध करून दिला यामुळे युवती महिलांनी अॅनी जोसेफ यांचे आभार व्यक्त केले कारण ज्या मुलींना शिक्षणाची आवड होती परंतु ते वीस किलोमीटर आंतर पार करण्याची आई-वडिल परवानगी देत नव्हते तेच काम अॅनी जोसेफ यांनी आपल्या प्रयत्नातून गावातच प्रशिक्षणासाठी संगणकाची भेट देऊन गावात संगणक उपलब्ध करून दिले या वेळी गावातील सरपंच दशरथ राऊत तसेच ग्रामसेवक मिसाळ उपस्थित होते आणि यावेळी सरपंच यांनी बोलतांना सांगितले की कॉम्पुटर दिल्याबद्धल सेंट अँन्स समाज सेवा संस्था चे ग्रामपंचायत पाली तर्फे आभार मानतो तसेच येणाऱ्या काही दिवसांमध्ये आम्ही महिला सक्षमीकरनासाठी या संगणकाचा खूप फायदा घेऊ व आम्ही ग्रामपंचायत कडून वेळोवेळी महिलांना प्रशिक्षण देण्याचे काम करू असे आश्वासन दिले ग्रामपंचायत कार्यालय व सर्व ग्रामस्थ आणि महिला व मुलींकडून सेंट अँन्स समाज सेवा केंद्राचे आभार मानले नक्कीच या संगणकामुळे आम्ही प्रगती करू अॅनी जोसेफ यांच्या प्रयत्नाला आम्ही तळा देणार नाही असे आश्वासन युवती व महिलांकडून देण्यात आलं.

Sharing

Visitor Counter