एमबीबीएस साठी निवड नौशिन  सिराज हीचा सत्कार

Beed

एमबीबीएस साठी निवड नौशिन  सिराज हीचा सत्कार

बीड/वार्ताहर 

बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध वृतपत्रलेखक, स्तंभलेखक तथा जिल्हा परिषदचे माध्यमिक शिक्षक  शेख सिराज यांची कन्या कु. शेख नौशिन सिराज यांना  एमबीबीएस साठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई या ठिकाणी प्रवेश मिळाला. याबद्दल अंबाजोगाई येथील उपविभागीय दंडाधिकारी शरद झाडके  यांनी शेख नौशिन सिराज यांचा  विशेष सत्कार केला . सदरील सत्काराचा कार्यक्रम उपविभागीय कार्यालययात झाला. यावेळी अंबाजोगाईचे तहसिलदार मा.डॉ. विपीन पाटील , नायब तहसिलदार  श्रीमती स्मिता बाहेती मॅडम तसेच , शेख नौशिनचे वडील शेख सिराज यांच्यासह कार्यालयातील सर्व कर्मचारी आदि उपस्थित होते. यावेळी   शेख नौशिन सिराज हीच्या घवघवीत यशाबद्दल अनेक मान्यवरांनी विशेष अभिनंदन केले . शेवटी सर्वांचे आभार शेख सिराज यांनी मानले.

 

 

 

Sharing

Visitor Counter