प्रेषित मोहमद ( स.अ ) यांच्या विरोधात अक्षेपार्ह बोलणार्‍यावर गुन्हा दाखल करा-रेहानाताई पठाण

Beed

प्रेषित मोहमद ( स.अ ) यांच्या विरोधात अक्षेपार्ह बोलणार्‍यावर गुन्हा दाखल करा-रेहानाताई पठाण 

बीड/वार्ताहर 

दि . 27.05.2022 रोजी सुमारे 9:30 बालमा इंग्रजी न्युज चॅनल टाईम्स नाऊवर मशिद प्रकरणावरील चर्च दरम्यान नुपूर शर्मा नावाच्या भाजप प्रवक्त्या या महिलेने प्रेषित मोहमद पैगंबर यांना शिवीगाळ केली होती तसेच आयशा रजिऊतालहा यांच्य विषयी सुध्दा आपमानिक शब्द बोलले आहे . तरी नुपूर शर्माचा उद्देश आहे . जातीय दंगली भडकाऊन त्याचा फायदा करून घेणे असे भाजपा सारखे पक्ष प्रत्येकवेळी कुठल्याना कुठल्या समाजाविषयो बोलुन समाजात तेढ व अशांतता पसरवण्याचे काम करत आहे . मुस्लीम समाजाचे प्रसारक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी केला त्यांचा संदेश सत्य , अहिंसा , त्याग , समपणे अशा अनेक गोष्टीची शिकवण त्यांनी दिली सर्व मुस्लीम समाजाचे आचार विचार त्यांच्यानुसार चालतात . खूप मोठे स्थान प्रत्येक मुस्लीम लोकांच्या मनात आहे . आज त्यांनी अपशब्द वापरून स्वताःच्या संस्काराचे प्रदर्शन केले आहे . प्रत्येक व्यक्तींनी काहीही बोलतांना विचारपूर्वक बोलावे स्वता : च्या प्रसिध्दीसाठी काहीपण बोलणार का ? त्यांना कुठलाही कायदा नाही का ? याचे भान नाही का ? कुठलाही पक्षाचा नेता असा होऊ शकत नाही . त्यांनी मुस्लीम धर्मातील लोकांच्या भावना खुप दुखावल्या . मा.साहेबांना कळकळेची विनंती आहे की , आपण अशा सुबुध्दीच्या राजकारणी नुपूर शर्माला लवकरात लवकर शिक्षा द्यावी व त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा अन्यथा आम्ही सर्व धर्म मिळुन देशातील प्रत्येक ठिकाणी लोकशाही पध्दतीने आंदोलन करू.

Sharing

Visitor Counter