तामीर ए मिल्लत हैदराबाद येथील मेळाव्यास हसीन अख्तर यांची विशेष उपस्थिती 

Beed

तामीर ए मिल्लत हैदराबाद येथील मेळाव्यास हसीन अख्तर यांची विशेष उपस्थिती 

बीड/प्रतिनिधी

देशभरातील अल्पसंख्यांक समाजासाठी कार्यरत असलेल्या ऑल इंडिया मजलिस तामीर ए मिल्लत संघटनेकडून हैदराबाद येथे दि. १५ जून बुधवार रोजी सर सय्यद हॉल नामपल्ली येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यात बीडहून सामाजिक कार्यकर्ते तथा सुप्रसिद्ध लेखक व शायर हसीन अख्तर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष जियाउद्दीन नय्यर असणार आहेत. याशिवाय संघटनेचे देशभरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती राहणार आहे. यामध्ये अल्पसंख्यांक समाजासाठी विविध क्षेत्रांमध्ये संघटनेकडून काय काय चांगले कार्य होऊ शकते तसेच देशभरातील अल्पसंख्याक समाजावर सध्या होत असलेल्या अन्याय, अत्याचारावर आणि शैक्षणिक विषयांवर मंथन करण्यात येणार असून यामध्ये विविध तत्त्ववेत्ते साहित्यिक व अल्पसंख्यांक समाजाच्या प्रश्नांची जाण असलेले अभ्यासक यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमासाठी बीडहून सामाजिक कार्यकर्ते तथा सुप्रसिद्ध लेखक व शायर हसीन अख्तर यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांची या कार्यक्रमात विशेष उपस्थिती राहणार आहे.

 

Sharing

Visitor Counter