समर्पित भाटीया आयोगाच्या मार्फत ओबीसींचा इम्पेरिकल डाटा चुकीच्या पध्दतीने गोळा करने थांबवा-सुभाष राऊत

समर्पित भाटीया आयोगाच्या मार्फत ओबीसींचा इम्पेरिकल डाटा चुकीच्या पध्दतीने गोळा करने थांबवा-सुभाष राऊत
बीड/वार्ताहर
समर्पित भाटीया आयोगाच्या मार्फत ओबीसींचा इम्पेरिकल डाटा चुकीच्या पध्दतीने गोळा करण्याचे काम चालू असून तात्काळ थांबवून घरोघरी जाऊन ओबीसींचा डाटा गोळा करण्याचं थांबवा या मागणीसाठी जिल्ह्यात अधिकाऱ्यांना निवेदन दिले.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केले नुसार ओबीसींची माहिती संकलित करण्यासाठी मा . बांठीया यांचे अध्यक्षतेखाली समर्पित आयोग गठीत केला . सदर आयोगाने मा . सर्वोच्च न्यायालयांस अपेक्षित असलेला इम्पेरिकल डाटा दारोदार जाऊन ओबीसींची खरी आर्थिक , सामाजिक , राजकीय स्थिीची माहिती संकलित होणे अपेक्षित होते . परंतू आमचे असे निदर्शनास आले आहे की , आयोग वरील प्रमाणे माहिती संकलित न करता सॉफ्टवेअर द्वारे आड नावानुसार सदोष पध्दतीने माहिती संकलित जमा करणे म्हणजे ओबीसी समाजाचे भविष्यातील यांचे कायमस्वरूपी कधीही भरून न येणारे नुकसान होणार आहे . करीता महोदयांना विनंती की , समर्पित आयोगा द्वारा चुकच्या पध्दतीने होणारे चुकीचे कामकाज तात्काळ थांबविण्या यावे व बी.एल.ओ. , तलाठी , ग्रामसेवक , अंगणवाडी सेविका अशा वर्कर यांचे मार्फत योग्य ती माहिती संकलित करून शासनामार्फत मा . सर्वोच न्यायालया समोर ठेवण्यात यावे अन्यथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल , त्याची परिणामाची जबाबदारी सर्वस्व प्रमुख म्हणून आपलीच राहील यासाठी हे निवेदन देण्यात करण्यात आलं.