गोदावरी नदी काठच्या दोन्ही तीरावरील गावाना सावधानतेचा इशारा

गोदावरी नदी काठच्या दोन्ही तीरावरील गावाना सावधानतेचा इशारा
बीड/वार्ताहर
जायकवाडी प्रकल्प, पैठण मध्ये 73.97 टक्के जिवंत पाणीसाठा आहे. पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असून, त्यामूळे पाणलोट क्षेत्रातील नदी, नाल्यांव्दारे जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढत असल्याने पाणी पातळी वाढत आहे. धरणाचे जलाशय प्रचलन आराखड्यानुसार आवश्यक असणारी पाणी पातळीचे नियमन करावयाचे असल्याने. अशीच आवक चालू राहिल्यास नजीकच्या काळात कधीही धरणाच्या गेटमधून/ सांडव्याव्दारे गोदावरी नदीमध्ये पुरपाणी सोडावे लागणार आहे. तरी गोदावरी नदी काठच्या दोन्ही तीरावरील लोकांना सतर्क राहणेबाबत तसेच नदीपात्रात कुणीही जाऊ नये, पाळीव प्राणी, गुरेढोरे, विद्युत मोटारी व तत्सम साहित्य इ. तात्काळ काढून घेण्याबाबत तसेच कुठलीही जीवित वा वित्तहानी होणार नाही. याबाबत उक्त गावंना तात्काळ सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे, असे कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभाग, नाथसागर प्र.भा. जाधव पैठण यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
