नगरपरिषद प्रशासनाच्या बावळट पणाचं खरंच कौतुक वाटतं -डाॅ.गणेश ढवळे 

Beed

नगरपरिषद प्रशासनाच्या बावळट पणाचं खरंच कौतुक वाटतं -डाॅ.गणेश ढवळे 

बीड नगरपरिषदेचा कारनामा आगीतुन फुफाट्यात अशी आसिफनगर मधिल नागरीकांची अवस्था -डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 

बीड/वार्ताहर 

नगरपरिषदेचा भ्रष्टाचार आणि अनागोंदी गलधान कारभार बीडकरांसाठी नित्याचाच झाला आहे. सध्या पावसाळ्यात मोठ्याप्रमाणात रस्यावर पाणी साचुन राहते,मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाच्या नावाखाली कागदोपत्रीच कामे दाखवुन निधीचा अपहार करण्यात आला असून रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे नागरीकांना त्रास होत असल्याबद्दल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसुफभाई यांनी वारंवार व्हीडीओ चित्रीकरण करून पोलखोल केलेली आहे. 

    त्यानंतर आसिफनगर भागातील पाणी साचलेल्या रस्त्यावर मुरूमाच्या नावाखाली मोठमोठाले मुरूम स्वरूपात दगड आणुन टाकलेले आहेत,त्याची रोलरने दबाई करणे आवश्यक होते परंतु केवळ थातूरमातूर काम करण्याची सवय असलेल्या नगरपरिषदेला दबाई करण्याची आवश्यकता वाटली नाही. परंतु त्याठीकाणी आता चारचाकी अथवा ३ चाकी वाहने तसेच पादचारी यांना जाताना अडचण येत असून आगीतुन फुफाट्यात पडल्याची तिव्र संतप्त प्रतिक्रीया आसिफनगर वासियांनी दिली आहे. या व्हीडीओचे चित्रीकरण एस.एम.युसुफ यांनी केले असून नगरपरिषदेच्या या वृत्तीचा निषेध केला आहे. 

Sharing

Visitor Counter