महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रा.शरद वंजारे

Beed

महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रा.शरद वंजारे

बीड/प्रतिनिधी

महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सव दिनानिमित्त नालंदा फाउंडेशन बीडचे अध्यक्ष प्रा.प्रदिप रोडे यांनी बैठकीचे आयोजन केले होते. दि.१६ ऑगस्ट रोजी सायं ७ वाजता ग्रंथालय तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय बीड येथे बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही.बनसोडे हे होते. यावेळी सर्वानुमते महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रा.शरद वंजारे यांची निवड केली. तसेच महोत्सव समितीच्या काव्य अभिवादन समिती प्रमुखपदी प्रा.डॉ.संजय कांबळे, गीत अभिवादन समिती प्रमुखपदी प्रा. दीपक जमदाडे, अभिवादन रॅली समिती प्रमुखपदी कॅप्टन राजाभाऊ आठवले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

महाकवी वामनदादा कर्डक यांचा जन्म शताब्दी महोत्सव बीड शहरामध्ये उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीचे अध्यक्ष पी.व्ही. बनसोडे यांनी दिली.यावेळी प्रा.राम गायकवाड, प्रोफेसर डॉ.मनोहर सिरसाट,प्रा. शरद मगर, ॲड.वाघमारे,दयानंद सरपते,प्रा.उत्तम साळवे,प्रा.विनोद किर्दक,प्रा.डॉ.प्रेमचंद सिरसट, सरकटे सर, भोले सर, प्रा.डॉ.विकास वाघमारे यासह समाजातील प्रतिष्ठित नागरिक यांची उपस्थिती होती.

 

Sharing

Visitor Counter