नालंदा फाउंडेशन महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय पुरस्कार सारंग दादा पवार यांना जाहीर

Beed

नालंदा फाउंडेशन महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय पुरस्कार सारंग दादा पवार यांना जाहीर

बीड/वार्ताहर 

महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी निमित्त महोत्सव समितीच्या वतीने बीड शहरामध्ये काव्य,गीत आणि रॅलीच्या माध्यमातून वामनदादा कर्डक यांना अभिवादन केले जाणार आहे. या समारंभात फुले - आंबेडकरी चळवळीचे ख्यातकीर्त गायक,कवी,दिग्दर्शक सारंग दादा पवार यांना नालंदा फाउंडेशन बीड च्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय पुरस्कार सन - २०२२ (वर्ष पहिले) जाहीर करण्यात आला असल्याची माहिती नालंदा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.प्रदीप रोडे यांनी दिली. २५ हजार रुपये रोख आणि सन्मानपत्र या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.

आंबेडकर चळवळीचा बुलंद आवाज असणारे महाकवी वामनदादा कर्डक यांनी आपल्या गीताच्या माध्यमातून सामाजिक क्रांतीचा विचार दिला, समाजाचे प्रबोधन घडविले हीच परंपरा पुढे घेऊन जात सारंग दादा पवार यांनी आपल्या गीतांमधून लोकप्रबोधनाची चळवळ गतिमान करण्याचे काम केले आहे. गेल्या तीन दशकापासून फुले - शाहू - आंबेडकरी चळवळीत समर्पित भावनेने सारंग दादा पवार हे काम करत आहेत. त्यांचे शंभराहून अधिक अल्बम प्रसिद्ध झाले असून सुरेश वाडकर, प्रल्हाद शिंदे, उत्तरा केळकर, स्वप्निल बांदोडकर, अभिजीत सावंत अशा आघाडीच्या गायकांनी त्यांची गीते गायली आहेत. तसेच चळवळीची प्रेरणादायी गीते आणि प्रबोधनात्मक गाणी ख्यातकीर्त गायक राहुल अन्विकर यांनी गायली आहेत. सारंग दादा पवार यांच्या आंबेडकरी चळवळीतील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय पुरस्कार सन-२०२२ (वर्ष पहिले) नालंदा फाउंडेशन बीडच्या वतीने त्यांना देण्यात येणार आहे. हा पुरस्कार दरवर्षी आंबेडकरी चळवळीतील गायक,कवी, दिग्दर्शक यांना देण्यात येणार असल्याचेही नालंदा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.प्रदीप रोडे यांनी सांगितले आहे.

Sharing

Visitor Counter