ग्लोबल ह्युमन राईटस सुरक्षा परिषदेकडुन फारुकी इलियास यांची बीड शहराध्यक्षपदी निवड

ग्लोबल ह्युमन राईटस सुरक्षा परिषदेकडुन फारुकी इलियास यांची बीड शहराध्यक्षपदी निवड
बीड/वार्ताहर
बीड शहरातील सामाजिक कार्यकर्ते तसेच दैनिक मित्र व गोरगरिब नागरिकांच्या अडचणीला धावुन जाणारे, सरकारी दवाखाना असो किंवा पोलिस स्टेशन कोणतेही प्रकरण असले तरी त्याचे निवारण कशा प्रकार करता येईल व प्रकरण कशा प्रकारे मार्ग लावतील असे सामाजिक व दैनिक मित्र फारुकी इलियास यांच्या कामाची दखल घेवुन दि. 18 ऑगस्ट रोजी ग्लोबल ह्युमन राईटस सुरक्षा परिषदेकडुन फारुकी इलियास यांची बीड शहराध्यक्षपदी निवड करुन त्यांना प्रशस्तीपत्र देवुन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
सदरील नियुक्तीबद्दल आंतराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषद मुंबई यांच्याकडुन नियुक्ती करण्यात आल्यामुळे बीड वकिल संघाचे सदस्य तसेच विधीतज्ञ ॲङअविनाश गंडले साहेब, हयुमन राईटसचे महाराष्ट्र अध्यक्ष अन्वर खानृ ॲङइम्रान पटेल, ॲङसदानंद वाघमारे, मुन्ना गायकवाड आदिंनी सत्कार करुन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या निवडी प्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष मनोगत व्यक्त करतांना म्हटले की, सामाजिक हिताचे काम करत राहणे व सामाजिक सुरक्षा व मानवाचे हित जोपासण्याचे पाहण्यासाठी मी सदैव तत्पर राहील व संघटनेला कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही व संघटनेचे विचार तळागाळात पोहाचविण्याचे काम करिल. या निवडीप्रसंगी बीड शहरातील वकिल संघ, पत्रकार संघ व सर्वस्तरातुन अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
