बिलकिसबानो प्रकरणी एक सप्टेंबरच्या आंदोलनामध्ये बहुसंख्येने सामिल व्हावे-ॲड. प्रा. इलियास इनामदार

Beed

बिलकिसबानो प्रकरणी एक सप्टेंबरच्या आंदोलनामध्ये बहुसंख्येने सामिल व्हावे-ॲड. प्रा. इलियास इनामदार

बीड/प्रतिनिधी

गुजरात दंगलीत गरोदार बिलकिसबानो गँग रेप व तीन वर्षाच्या लहान मुलीसह कुटुंबातील सात सदस्यांची अमानुषपणे हत्या करणाऱ्या अकरा आरोपींची गुजरात सरकार व केंद्रीय गृह मंत्रालयाने शिक्षा माफ करुन त्यांना बरी करुन टाकले या निर्णयाचा विरोध करुन 23 ऑगस्टला लोकसेनाने जिल्हाधिकारी बीड मार्फ़त राष्ट्रपतीसह भारत सरकार व गुजरात सरकारला इशारा निवेदन व 26 ऑगस्टला घरावर मोटरसायकलवर काळे झेन्डे लावून निषेध नोंदवला व या घटनेतील आरोपीँची माफ करण्यात आलेली शिक्षा रद्द करावी नसता एक सप्टेंबरला मोदी-भाजपा चले जाव आंदोलन करू असा इशारा लोकसेनाने सरकारला दिलेला होता. येणाऱ्या एक सप्टेंबरला गुरुवारी सकाळी 11 वाजता बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती लोकसेना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार यांनी दिली आहे.

    देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात महिलांचा आदर करा, बेटी पढ़ाओ बेटी बचाओ, सबका साथ सबका विकास म्हणणारे मोदी साहेब स्वत:च्या राज्यामध्ये स्वत: नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना ज्या महिलेवर अत्याचार झाले त्याच्या डोळयासमोर तिच्या तीन वर्षाच्या मुलीला दगडावर आपटून ठार मारण्यात आले तिच्या परिवारातील सात लोकांची क्रूरपणे हत्या करण्यात आली त्या पीड़ितेला पंतप्रधान असताना न्याय देतील का? मुँह मे राम और दिल मे छुरा वाली तो नीती नहीं है ना मोदीजी? लोकसेनाचे जनतेला आव्हान की या आंदोलनामध्ये बहुसंख्येने सामिल होवून एक पीड़ित महिलेला न्याय मिळवुन द्यावे. व या आंदोलनात सहभागी व्हावे असे आव्हान ॲड. प्रा. इलियास इनामदार, जिल्हाध्यक्ष सुफियान मणियार, मिर्ज़ा खैसर बेग, प्रा. संजय खांडेकर, अतीख अहमद खान, ॲड. कलीम काज़ी, शेख अयाज़ अखतर, अकबर अतार नदीम मेंबर, शेख साबेर, नाज़ेम बेग, समीर पटेल यांनी सर्व पक्ष-संघटना समाजसेवी संस्था व नागरिकांना केले आहे.

                                

Sharing

Visitor Counter