हे गणराया जिल्हाप्रशासनाला सदबुद्धी दे ,वृक्षलागवड मोहीम ही लोकचळवळ आहे इव्हेंट नव्हे

हे गणराया जिल्हाप्रशासनाला सदबुद्धी दे ,वृक्षलागवड मोहीम ही लोकचळवळ आहे इव्हेंट नव्हे ; वनविभाग,रोहयो अंतर्गत वृक्षलागवड गैरव्यवहार प्रकरणात कारवाईसाठी "दिमाग की बत्ति जलाओ आंदोलन-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
बीड जिल्हाप्रशासन ११ सप्टेंबर रोजीच्या अमृतमहोत्सव निमित्त वृक्षलागवड मोहीमेच्या "इव्हेंट कार्यक्रमात "व्यस्त आहे. सामाजिक संघटना यांच्या मदतीने हा इव्हेंट जोरदार करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र याच जिल्हाप्रशासनातील जिल्हाधिकारी यांच्यासह वरिष्ठ आधिकारी सामाजिक संघटना यांनी २ वर्षापासून वनविभाग तसेच रोहयो अंतर्गत वृक्षलागवड गैरव्यवहार प्रकरणात पुराव्यासह तक्रार आंदोलनानंतर सुद्धा जाणीवपूर्वक कारवाईस टाळाटाळ करत असुन त्यांना गणरायाने सदबुद्धी द्यावी तसेच वृक्षलागवड गैरव्यवहार प्रकरणात कारवाई करावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पणत्या पेटवून "दिमाग की बत्ती जलाओ आंदोलन "करण्यात येत असून आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समिती बीड तालुकाध्यक्ष शेख युनुस च-हाटकर,सय्यद आबेद बीडकर.शेख मुश्ताक, शेख मोहजिब,धनंजय सानप खडकवाडीकर,दिपक बांगर आदि सहभागी असुन निवेदन तहसीलदार जि.का.बीड संतोष बनकर यांना देण्यात आले.
जिल्हाधिका-यांच्या आदेशाला वनविभागाकडुन केराची टोपली
यांनी वनविभागातील विविध तक्रारीच्या अनुषंगानेच विभागीय वन आधिकारी (प्रादेशिक)विभागीय वन आधिकारी (वन्यजीव)विभागीय वन आधिकारी (सामाजिक वनीकरण) यांच्याकडील योजनेंतर्गत केलेल्या कामांची व खर्चाचा सविस्तर अहवाल व खुलासा सादर करण्याबाबत वारंवार कळवुन सुद्धा तसेच दोन वेळा स्मरणपत्रे पाठवुनही अहवाल सादर केलेला नाही ही अतिशय गंभीर बाब आहे कार्यालयाचा सविस्तर अहवाल समक्ष भेटुन सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र वनविभागाकडुन याला किंचितही प्रतिसाद दिसुन येत नसुन या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचेच दिसुन येते.
जिल्हाधिकारी कार्यालय म्हणतं ७ वेळा आदेश देऊन सुद्धा वन आधिकारी बीड यांनी अद्याप अहवाल सादर केलेला नाही ; माहिती आधिकारात उघड
जिल्हा नियोजन समितीकडुन वनविभागातील विविध कामांसाठी कोरोना कालावधीत १० कोटी ८४ लाख रूपये कागदोपत्रीच बोगस कामे दाखवुन अपहार प्रकरणात विविध संघटनांनी तक्रारी आंदोलन केलेली आहेत. डाॅ.गणेश ढवळे यांनी केलेल्या तक्रारी आंदोलन अनुषंगानेच जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांनी दि.०२ मार्च २०२१ ,दि. ०४ मार्च २०२१ ,दि.०५ मार्च २०२१ , दि.०८ मार्च २०२१ ,दि.१२ मार्च २०२१ ,दि.०७ जुलै २०२१ ,दि.३१ जुलै २०२१ अन्वये विभागीय वन आधिकारी बीड यांना निवेदनात नमूद मुद्यांबाबत नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करणेबाबत वेळोवेळी कळविलेले आहे तथापि वन आधिकारी बीड यांनी अद्याप पावेतो कोणताही अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केलेला नाही. ही माहिती टी.एस. आर्सुळ जन माहिती आधिकारी तथा नायब तहसीलदार (गृह) जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांनी माहिती आधिकारात दिलेली आहे.
समिक्षा चंद्राकर उप आयुक्त (रोहयो) औरंगाबाद यांच्या आदेशाची जिल्हाधिकारी कार्यालया कडुनच अवमानना
बीड जिल्ह्य़ातील विविध भागातील वनविभागातील गैरव्यवहार प्रकरणात तक्रारीनंतर वनविभागात वारंवार आगीच्या घटना घडण्याचे प्रमाण वाढल्यानंतर डाॅ.गणेश ढवळे यांनी दि.०४ एप्रिल २०२२ रोजी विभागीय आयुक्त औरंगाबाद कार्यालयासमोर आमरण उपोषण करणेबाबत निवेदन दिल्यानंतर समिक्षा चंद्राकर उप आयुक्त (रोहयो)औरंगाबाद यांनी जिल्हाधिकारी बीड यांना मुद्यांसंबधित आधिकारी -कर्मचारी यांची जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे उपजिल्हाधिकारी (रोहयो)यांचे अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करून तोडगा काढावा व अर्जदारास उपोषणापासुन परावृत्त करावे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तात्काळ सादर करण्यात यावा म्हटले होते परंतु जिल्हाधिकारी बीड यांनी अर्जदारांची बैठक बोलावलीच नाही तसेच वनविभागातील आगीच्या प्रकरणात कोणासही जबाबदार धरून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
जिल्हाप्रशासन म्हणतंय वृक्षलागवड करा आणि शासकीय कार्यालयातच वृक्षतोड
जिल्हाप्रशासन जरी वृक्षलागवड मोहीमेचा इव्हेंट म्हणून वृक्षलागवड करण्याचा सल्ला देत असले तरी बीड शहरातील जिल्हाप्रशासन कार्यालय उदाहरणार्थ जिल्हाधिकारी कार्यालय,शासकीय विश्रामगृह,जिल्हा क्रिडा संकुल,तहसिल,सार्वजनिक बांधकाम विभाग आदि कार्यालयात विनापरवानगी बेकायदेशीर वृक्षतोड करण्यात आल्याचे आढळुन आले असून संबधित प्रकरणात जबाबदार आधिका-यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
