शनी मंदिरासमोरील प्रवेशद्वारा समोरच अवैध धंद्यांना ऊत

शनी मंदिरासमोरील प्रवेशद्वारा समोरच अवैध धंद्यांना ऊत
चकलांबा पोलिस ठाणे हद्दीत अवैद्य धंद्याचा सुळसुळाट
बीड/वार्ताहर
चकलांबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या अनेक महिन्यापासून अवैध धंद्यांनी धुमाकूळ घालत या पोलिस ठाणे हद्दीत सोरट , वाळू , दारू , मटका , गुटखा या अवैध धंद्याचा महापूर आला आहे . राशसभूवन येथिल महाराष्ट्र जगात प्रसिद्ध असलेल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ श्री क्षेत्र राक्षसभूवन शनिचे या परिसरात अवैध धंद्यांना ऊत आलेला असून, शनी मंदिरा समोरील भागात, मुख्य प्रवेशद्वारा जवळच अनेकांनी टपरी हॉटेल मध्ये देशी विदेशी दारू मोठ्या प्रमाणात साठा करून विक्री करीत आहेत, तसेच लहान मुलांना पैशाचे आम्हीच दाखवून खुलेआम सोरट नावाचा मोठ्या प्रमाणात राजरोसपणे चालू असून स्थानिक बीट जमादाराच्या आशीर्वादाने व चकलांबा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक यांच्या कृपादृष्टीने,व स्थानिक गुन्हे शाखेच्या दुर्लक्षाने हे धंदे मागील पाच वर्षात फोफवलेले आहेत, अनेक वर्षापासून वरिष्ठांना याबाबत माहिती नसल्याने, अवैध धंदे करणारे धनाड्य व राजकीय संबंध असल्याने मोठ्या प्रमाणात गडगंज झालेले आहेत, यांना आळा घालण्यासाठी व तरुण पिढी व ऊसतोड कामगार ऊसतोड मजूर, लहान बच्चे कंपनी दारूच्या नशेत व सोरट जुगाराच्या आहारी जाऊन देशोधडीला लागत आहे, याची जबाबदारी चकलांबा ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी घेणार का? हा मोठा प्रश्न असून मा. कर्तव्यदक्ष एसपी साहेबांनी श्री. नंदकुमारजी ठाकूर साहेबांनी लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यासह परिसरातील नागरिक दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून मागणी होत आहे.
त्यामुळे या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोरगरीबांचे संसार उद्ध्वस्त करण्याचे काम या पोलिस ठाण्याचा ठाणेदार यांनी विडाच उचलला की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे . याच परिसरात खामगाव , नागझरी , आगरनांदूर , राक्षसभुवन , गंगावाडी , सावळेश्वर म्हाळसा पिंपळगाव , राक्षसभुवन फाटा , आगरनांदूर फाटा आदी परिसरात दारूचा महापूर वाहत असताना दिवसा ढवळ्या या परिसरात मोठ्या प्रमाणात टपरी तेथे दारू अशी परिस्थिती निर्माण झाली असताना चकलांबा पोलिस ठाण्याचा ठाणेदार नुसता नावालाच आहे की काय ? त्यामुळे बीड गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलिस ठाण्यातंर्गत मोठ्या प्रमाणात गावे आहेत . त्यामुळे या गावामध्ये अवैध धंद्यांनी जोर धरला आहे . त्यामुळे या पोलिस ठाण्याच्या हृद्दीमध्ये मटका , वाळू , अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे . भर रस्त्यावरही चहाच्या गाड्यावर किंवा हॉटेलवर देशी विदेशी दारू मिळत आहे . त्यामुळे आजही या परिसरातील सर्वसामान्य जनता देशोधडीला लावण्याचे काम या चकलांबा पोलिस ठाण्याचा ठाणेदार यांनी विडा उचलला की काय ? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच याकडे मात्र स्थानिक गुन्हा शाखेचे पथक लक्ष द्यायला तयार नाही . त्यामुळे याच परिसरामध्ये गोदावरी नदीपात्र आहे . या नदीपात्रातून व चकलांबा पोलिस चारशे ते पाचशे हॉटेल , टपरी या रस्त्यावर आहेत . या टपऱ्यावरही देशी विदेशी दारूची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे . त्यामुळे या परिसरातील जनता आता वैतागली आहे . त्यामुळे चकलांबा पोलिस ठाण्याचा ठाणेदार बदलावा अशी चर्चा होऊ लागली आहे . त्यामुळे बीडच्या स्थानिक गुन्हा शाखेने लवकरच या परिसरात धाडसत्र सुरू करून येथील नागरीकांना न्याय द्यावा अशी जनतेतून मागणी होऊ लागली आहे .