नांदूर येथील चेअरमन दत्ता विधाते यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना मोहटादेवीचे घडविले दर्शन 

Beed

नांदूर येथील चेअरमन दत्ता विधाते यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना मोहटादेवीचे घडविले दर्शन 

विविध सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा

आष्टी/प्रतिनिधी 

तालुक्यातील नांदूर येथील संतकृपा दूध संकलन केंद्रांचे चेअरमन दत्ता विधाते यांच्या वाढदिवसानिमित्त माजी सरपंच संजय दादा विधाते यांच्या प्रेरणेने नांदूर येथील महिलांना मोहटादेवीचे दर्शन घडवून फराळाचे वाटप करण्यात आले तसेच गावात विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

आष्टी तालुक्यातील नेहमीत सामाजिक उपक्रम राबवण्याचे कार्य करणारे संतकृपा दूध संकलन केंद्रांचे चेअरमन दत्ता विधाते कार्यकर्ते सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात वाढदिवस म्हटलं की हजारो रुपयांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी सध्याची पिढी हजारो रुपये अनर्थ उडवताना दिसत आहे.पण याला अपवाद आहेत.ते दत्ता विधाते वाढदिवसाच्या अनर्थ खर्चाला फाटा देत सामाजिक हित म्हणून नवरात्र उत्सव असल्याने नांदूर गावातील १५० महिलांना स्वखर्चाने तीन बस व्दारे महिलांना मोहटादेवीचे दर्शन घडवून फराळाचे वाटप केले याआधीही सामाजिक बांधिलकी जपत नांदूर,बाळेवाडी गावातील जनावरांना मोफत लम्पीचे लसीकरण करण्यात आले. 

या सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा केला त्यांच्या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.तर नांदूर ग्रामस्थांनी वाढदिवसानिमित्त केक कापून सत्कार केला व आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सागर विधाते, नरहरी विधाते, सुरेश विधाते,सुंभम विधाते, विनोद खिळदकर,बाळु तरपे, शताणू खिळदकर,शरद गवळी, सतिश विरकर, संतोष खिळदकर,पवन गावडे, गणेश शिंदे, नितिन विधाते, सुरेश खिळदकर,विजय विधाते, चंद्रकांत विधाते,गोरख विधाते, संदिप विधाते आदी उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter