खोटे कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी जामीन मंजूर

खोटे कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी जामीन मंजूर
गेवराई/प्रतिनिधी
तालुक्यात बचत गटाचे खोटे कागदपत्र तयार करून १७ लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन आरोपींची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दोन आरोपींची जामीनावर मुक्तता केली आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, गेवराई तालुक्यात बचत गटाचे खोटे कागदपत्र तयार करून १७ लोकांची ३५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी गेवराई (घुगे साहेब) यांनी दोन आरोपी नामे सय्यद अब्बास आणि सय्यद आवेज रा. संजय नगर, गेवराई यांची जामीनावर मुक्तता केली आहे. सदर आरोपींवर भारतीय दंड विधान चे कलम ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४७१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता परंतु माननीय न्यायालयाने अॅड. सय्यद असिमा पटेल यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींची जामीनावर मुक्तता केली आहे. सदर प्रकरणावर पूर्ण गेवराई करांचे लक्ष केंद्रित होते. सदर प्रकरणात अॅड. सय्यद असिमा पटेल यांना ॲड. सय्यद नासेर पटेल आणि अॅड. सय्यद शाहरुख पटेल यांनी सहकार्य केले.
