कुटेवाडी ग्रामपंचायत निवडणूक जेष्ठ नागरिकांच्या प्रस्तावनेतून बिनविरोध करुन अनावश्यक खर्च टाळा- पूर्व सैनिक प्रकाश वाघमारे

कुटेवाडी ग्रामपंचायत निवडणूक जेष्ठ नागरिकांच्या प्रस्तावनेतून बिनविरोध करुन अनावश्यक खर्च टाळा- पूर्व सैनिक प्रकाश वाघमारे
बीड/प्रतिनिधी
दि.11 कुटेवाडी ग्रामपंचायत अस्तीत्वात येवून 40 वर्षे झाली परंतू या गांवचा ढाचा स्वातंत्र्यपूर्व जो होता तोच आहे. किमान आठ वेळा सदरील ग्रामपंचायत निवडणूका झाल्या. सदस्य, सरपंच निवडले सरपंच पदाच्या व्यष्क्ती महत्वाने आपल्या फायद्यानुसार कामकाज केले. सदस्य मात्र जय हारी म्हणत राहिले असा संभ्रमीत अवस्थेत गांवाच्या योजना ठिक राबवल्याचे दिसत नाहीत. कुटेवाडी गांवाचा दर्जा शुन्यातच राहिला.
पक्ष पार्या पॅनल निवडणूकीत उद्माद आर्थिक अदान प्रदान करून निवडणूक लढवून निवडून येवू लागले. मतदार आपला हक्क अधिकार निःपक्ष न बजावल्याने गांव समस्यांची वाताहात होण्यात भर पडत राहील. या गांवचे बहुतांश मतदार कंस्ट्रक्शन कामगार असल्याने मुंबई, बेंगलूर, दिल्ली देश, विदेशात कामानिमित्त आहेत. तर काही बीड जिल्ह्यात स्थलांतरीत आहेत. हे मतदार जेंव्हा गावात मताधिकार बजवण्याकरिता येतात. तेंव्हा या गांव ग्रामपंचायतचे उमदेवार यांना गोडीचे शब्द व त्याची मानसिकता ओळखून त्याला खुश केले की हे मतदार भविष्य वर्तमानाचा विचार न करता चुकीच्या व्यक्तींना निवडून देतात व पाच वर्षानंतर बघतो, तुझ्याकडे म्हणून कल्पतरूची वाट पाहतात. निवडून आलेली ग्रामपंचायत पॅनल गावांबाहेरील प्रस्थापित राजकारण्याच्या मनाप्रमाणे ग्रामपंचायत कारभार चालवतात अशा वातावरणात सुडबुध्दीचा वापर ही केला जातो. जसे पेराल तसेच ऊगवेल याची समीक्षा करणे गरजेचे आहे. वितांड खर्च टाळून गांवाचा विकास करणे अनिवार्य वाटत असेल तर गांवातील सज्ञ जेष्ठ नागरीकांनी घेवून बिनविरोध निवडणूक करावी अशी पत्रकाद्वारे पूर्वसैनिक प्रकाश वाघमारे यांनी मागणी केली आहे.