आंबेडकरवादी मिशन आयोजित "राष्ट्रीय शिक्षण क्रांती अभियान"चा बीड मध्ये प्रबोधन कार्यक्रम २६ डिसेंबरला

Beed

आंबेडकरवादी मिशन आयोजित "राष्ट्रीय शिक्षण क्रांती अभियान"चा बीड मध्ये प्रबोधन कार्यक्रम २६ डिसेंबरला

 बीड/प्रतिनिधी

आंबेडकरवादी मिशन तथा युनिव्हर्सल बुध्दिस्ट फाऊंडेशन,नांदेड द्वारा आयोजित राष्ट्रीय शिक्षण क्रांती अभियानाचा प्रबोधन कार्यक्रम बीड मध्ये दि.२६ डिसेंबर २०२२ सोमवार रोजी सायंकाळी ठीक ०७.०० वाजता" यशवंतराव चव्हाण नाट्यगृह" बीड येथे संपन्न होणार आहे.हे राष्ट्रीय शिक्षण क्रांती अभियान नांदेड पासून ते परभणी, बीड,जालना,औरंगाबाद,अहमदनगर, ते महात्मा फुलेवाडा (प्रथम शाळा),पुणे या ठिकाणी दिनांक २५ डिसेंबर २०२२ ते दिनांक ०१ जानेवारी २०२३ पर्यंत राबविण्यात येणार आहे.सर्व समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची प्रेरणा मिळावी,व त्यांना राष्ट्र निर्मितीत योगदान देता यावे.यासाठी आंबेडकरवादी मिशनच्या वतीने 'राष्ट्रीय शिक्षण क्रांती अभियानाचे' आयोजन करण्यात आले आहे.तेव्हा सर्व समाजातील शिक्षणप्रेमी विद्यार्थ्यांनी,पालकांनी,सुज्ञजनांनी बुध्दिजीवी लोकांनी या अभियानात सहभागी व्हावे,विशेषत:बीड येथील प्रबोधन कार्यक्रमात उपस्थित राहावे असे आवाहन आंबेडकरवादी मिशनचे विद्यार्थी प्रा.डाॅ.संजय सावते व सर्व बहुजन शिक्षण प्रेमी बांधव यांनी केले आहे.

Sharing

Visitor Counter