मादळमोही जि.प. शाळेत खरी कमाई उपक्रम हर्षोल्लासात साजरा

Beed

मादळमोही जि.प. शाळेत खरी कमाई उपक्रम हर्षोल्लासात साजरा

गेवराई/प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात असलेल्या मादळमोही उर्दू जि. प. शाळेत शाळेतील विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थाचे स्टॉल लावून बाल आनंद मेळावा साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञान बरोबरच व्यवहारिक आणि आर्थिक बाबींचे ज्ञान ही मिळावे तसेच नफा-तोटा आणि दुकान लावून खरेदी विक्रीचे अनुभव, छोटे व्यवसाय कसे सुरु करायचे याची कुशलता विद्यार्थ्यांना कळावी या उद्देशाने मादळमोही उर्दू जि.प. शाळेत खरी कमाई उपक्रम मोठ्या हर्षोल्लासात घेण्यात आला.

    या अनुषंगाने शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अतिक पठाण, महिला पालक शेख अस्मा कदीर , तसेच शाळेचे मुख्याध्यापक अतिया बेगम, शिक्षक वर्गातून माजेद अहेमद, सय्यद रहीम, शेख सोहेल, सय्यद रफत, शेख मलेका निखत आणि पालक वर्ग आदी उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter