अंतरवन पिंपरी तांड्यात विवाहितेची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा द्यावी-प्रिया डोईफोडे

Beed

अंतरवन पिंपरी तांड्यात विवाहितेची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा द्यावी-प्रिया डोईफोडे

बीड प्रतिनीधी 

ता. १३ मार्च – बीड तालुक्यातील अंतरवन पिंपरी तांडा येथे सासरच्या जुलमाला कंटाळून एका विवाहितेची अमानुष हत्या करण्यात आली. प्रिया राठोड या तरुण विवाहितेचा सासरच्या लोकांनी चटके देऊन, गळा आवळून निर्घृण खून केला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.या क्रूर हत्येने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपींना कठोर शासन व्हावे, अशी मागणी  राष्ट्रवादी युवती आघाडीच्या बीड जिल्हाध्यक्ष प्रिया डोईफोडे यांनी केली असुन या घटनेचा तीव्र निषेध करत सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

या अमानुष हत्येचा निषेध करत डोईफोडे यांनी सांगितले की, "अशा राक्षसी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आरोपींना कठोर शासन होणे अत्यंत आवश्यक आहे. न्याय न मिळाल्यास आंदोलन छेडले जाईल."या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. आरोपींवर कठोर कारवाई होणार का? याकडे संपूर्ण समाजाचे लक्ष लागले असून आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादीच्या युती जिल्हाध्यक्ष प्रिया डोईफोडे यांनी केली आहे.

 

Sharing

Visitor Counter