बीएसएनएलचे कार्यालय म्हणजे असून अडचण नसून खोळंबा,सरकारकडूनच फोनच्या नावाखाली ग्राहकांची लूट

बीएसएनएलचे कार्यालय म्हणजे असून अडचण नसून खोळंबा,सरकारकडूनच फोनच्या नावाखाली ग्राहकांची लूट

आष्टी/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज

येथील बीएसएनएल कार्यालयामध्ये बोटावर मोजण्याइतके कर्मचारी राहिले असून अनेकांनी रिटायरमेंट घेतल्याने आष्टी बीएसएनएलचे तीन-तेरा वाजले आहेत जवळपास 90 टक्के लँडलाईन फोन आष्टीतील बंद असून इंटरनेट सेवा ही अनेकांची कित्तेक दिवसापासून बंद पडली आहे अनेक वेळा ग्राहकांनी या ऑफिसमध्ये हेलपाटे मारून सुद्धा ते फोन दुरुस्त होत नाही उलट त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही दुसरे बाहेरचे इंटरनेट कनेक्शन घ्या असे सांगितले जाते तर लँडलाईन फोन दुरुस्तीचे काम गुत्तेदार मार्फत केले जाते हा गुत्तेदार आष्टीत कुठलेही फोन दुरुस्त करत नाही यापूर्वी दुरुस्तीवर जे कर्मचारी होते त्यांचे अनेक दिवसापासून चे पगार या गुत्तेदाराने थकल्यामुळे केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांची लागेबांधे असल्याने या गुत्तेदाराचे फावले मात्र सर्वसामान्य जनता यात भरडली जात आहे बीएसएनएल हे सरकारी असून सुद्धा फोन बंद असले तरीही ग्राहकाकडून बिल आकारले जाते आणि इंटरनेट सेवा बंद असली तरी ग्राहकाकडून बिल आकारले जाते ही बाब दुर्दैवी असून या बीएसएनएल विषयी मोठ्या प्रमाणात संताप आष्टीत जनतेतून होत आहे केवळ बिल भरून घेण्यापुरतेच काम आष्टीच्या बीएसएनएल कार्यालयात केले जाते यासंदर्भात येथील अधिकार्यांशी संपर्क साधला असता आमचा नाविलाज आहे तुम्ही वरिष्ठांशी बोला अशा प्रकारे बोलून ते ही हात झटकून टाकतात वरिष्ठ कार्यालयाकडे संपर्क साधल्यावर तो गुत्तेदार काम करत नाही अशा प्रकारची भूमिका तेथील वरिष्ठ घेतात मग सर्वसामान्यांना प्रश्न पडतो की हे बीएसएनएल कार्यालय कशासाठी आहे याठिकाणी कुठलेही फोन सुरू नसताना त्यांच्यावर बिलाच्या नावाखाली ही वसुली नव्हे तर काय असा प्रश्न सर्वसामान्याना पडला आहे.

Sharing

Visitor Counter