जिल्हा मतदार संघाचा प्रभारी म्हणून अनिलदादा जगताप यांची नियुक्ती!

Beed

जिल्हा मतदार संघाचा प्रभारी म्हणून अनिलदादा जगताप यांची नियुक्ती!

मातोश्री निवास्थानी उद्धवसाहेबांसोबत जिल्ह्यातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा- अनिलदादा जगताप

बीड/प्रतिनिधी

  गेल्या काही दिवसांपासून बीड शिवसेना संपर्कप्रमुख किशोर पोतदार आणि शिवसेना जिल्हा प्रमुख अनिलदादा जगताप जिह्यातील विविध तालुक्यामध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांना पक्ष मजबुतीकरनासाठी मार्गदर्शन करत होते. याचबरोबर सर्व सामान्यांशी देखील प्रत्यक्ष संपर्कात होते. यादरम्यान बीड शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या अडी अडचणी समजून घेऊन तालुकास्तरावर त्या अडचणी सोडवण्याचे देखील त्यांचे काम सुरु होते. या बैठकांनंतर लागलीच बीड संपर्कप्रमुख किशोर पोतदार साहेब यांच्यासह अनिलदादा जगताप यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची मातोश्री निवास्थानी जाऊन भेट घेतली. बीड जिल्ह्यातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. दरम्यान उद्धवसाहेब ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख पदाचे यथोचित निर्विवाद काम पार पडणाऱ्या आणि शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल्या अनिलदादा जगताप यांच्यावर बीड जिल्ह्याच्या

माजलगांव, परळी, केज या मतदार संघाचा प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीनंतर अनिल जगताप यांनी सांगितले की, उद्धवसाहेब ठाकरे यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आणि दिलेल्या आदेशानुसार पुढील मार्गक्रमन सुरु राहील. 

याप्रसंगी उध्दव ठाकरे साहेब यांच्या भेटी दरम्यान मातोश्रीवर खासदार तथा शिवसेना सचिव विनायक राऊत, खासदार तथा शिवसेना सचिव अनिलजी देसाई,खासदार तथा शिवसेना नेते अरविंद सावंत, शिवसेना नेते तथा माजी मंत्री अनिल परब, शिवसेना प्रतोद आ.सुनिल प्रभु, जिल्हा संपर्कप्रमुख किशोरजी पोतदार माजी न.प.सभापती सुनिल अनभुले उपस्थित होते.

Sharing