किल्ले धारूर शहरातील नागरिकांच्या घराच्या भिंतीवरील झाडे काढून वैकुंठ भुमीत केले वृक्षारोपण

किल्ले धारूर शहरातील नागरिकांच्या घराच्या भिंतीवरील झाडे काढून वैकुंठ भुमीत केले वृक्षारोपण
किल्लेधारूर/प्रतिनिधी
किल्ले धारूर शहरातील सामाजिक कार्यात सातत्य ठेवणारी कायाकल्प फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षापासून शहरातील पोलिस स्टेशनच्या पाठीमागे वैकुंठ भूमीत वृक्षारोपण व त्या वृक्षांचे संगोपनाचे कार्य चालू आहे. गेल्यावर्षी वैकुंठ भूमीमध्ये जवळपास ४० ते ५० रोपटे लावून त्याचे संगोपन केले आहे. या वर्षी त्याचे स्वरूप वाढवत वैकुंठ भुमीचा परिसर निसर्गरम्य करण्याचा संकल्प केला असल्याने वृक्षलागवड करण्यात येत आहे.
कायाकल्प फाऊंडेशनच्या सदस्यांनी दोन आठवड्यापूर्वी नागरिकांच्या घराच्या भिंतीवर पिंपळाचे, वडाचे रोपटे असेल तर भविष्यात घराच्या भिंतीला किंवा छताला तढे जाऊन पडू शकते. हे पडल्याने जिवितहानी होऊ नये यासाठी हे रोपटे मुळांसह काढून लागवड केली तर झाडाला झाड जिवंत राहणार असल्याने हे काढलेले झाड किल्ले धारूर शहरातील पोलिस स्टेशनच्या पाठीमागील वैकुंठ भूमीत वृक्षारोपण करणार आहोत असे आवाहन केले असल्याने यास शहरातील नागरिक प्रतिसाद देत आहेत.
किल्ले धारूर युथ क्लब सचिव तथा किल्ले धारूर सराफ संघटनेचे सदस्य अविनाशजी चिद्रवार यांच्या घराच्या भिंतीवर पिंपळाचे रोपटे मोठे होते. हे रोपटे जवळपास दहा ते पंधरा फूट उंचीचे झाले होते. ही रोपटे जमिनीवर नव्हते. भविष्यात या रोपट्यांनी मोठे रूप धारण केले असल्याने भिंतीला तडे गेलेच असते व भिंत पडल्याने जिवितहानी झाली असती. झाडांमुळे कोणताच अपघात होऊ नये म्हणून भविष्यातील संकट टाळण्यासाठी हा उपक्रम चालू आहे. यास अविनाशजी चिद्रवार यांनी परवानगी दिल्याने कायाकल्प सदस्य तथा वृक्षमित्रांनी हे पिंपळाचे झाड मुळासह काढण्यात यश मिळवले व नंतर हे पिंपळाचे झाड वैकुंठ भुमीत लागवड करण्यात आले.
यावेळी कायाकल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष दिनेश कापसे, किल्ले धारूर युथ क्लब सचिव तथा किल्ले धारूर सराफ संघटनेचे सदस्य अविनाशजी चिद्रवार, किल्ले धारूर शहरातील युवा व्यापारी अभयजी चिद्रवार, किल्ले धारूर कायाकल्प फाऊंडेशनचे सचिव विश्वानंद तोष्णिवाल, जलदुत विजय शिनगारे यांनी वैकुंठ भूमीमध्ये वृक्षारोपण केले.