बीड पोलिसांनी आता हाती घेतला‘प्रोजेक्ट सहाय्यता’ मदत कक्ष

Beed

डिप्रेशनमध्ये कोणत्याही प्रकारचे चुकीचे पाऊल उचलू नका तुमच्या सहाय्यतेसाठी आम्ही 24 तास तत्पर - हर्ष पोद्दार

बीड पोलिसांनी आता हाती घेतला‘प्रोजेक्ट सहाय्यता’ मदत कक्ष

बीड/वृत्तपत्र

लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये मानसिक आजारी व डिप्रेशन, नैराश्यग्रस्त अशा प्रकारचे रूग्ण वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यातून काही जण थेट आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. या घटना रोखण्यासाठी बीड पोलिसांनी आता ‘प्रोजेक्ट सहाय्यता’ मदत कक्ष हाती घेतला आहे. त्यामुळे डिप्रेशनमध्ये कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नका, बीड पोलिस आपल्या सहाय्येसाठी 24 तास तत्पर आहे. तुम्ही आमच्याशी बोला, आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करून तुम्हाला या कठीण प्रसंगातून निश्‍चितच बाहेर काढू, असा विश्‍वास पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी आपल्या आवाहनातून जिल्हावासियांसमोर व्यक्त केला आहे.
जे लोक डिप्रेशनमध्ये आहेत किंवा काही मानसिक आजारातून जात आहेत ते लोक शक्यतो आपले दु:ख किंवा त्रास इतर कोणत्याही व्यक्तीजवळ व्यक्त करीत नाहीत, अशा वेळी आवश्यकता असते की समाज आणि प्रशासनाने अशा लोकांना सहानुभुतिचा हात द्यावा, कित्येक वेळा अशा लोकांशी बोलल्यानंतर किंवा चर्चा केल्यानंतर त्यांची मानसिकता बदलून त्यांचा त्रास, दु:ख कमी केल्या जावू शकतो. याबाबींना विचारात घेवूनच बीड पोलिस दलाने ‘प्रोजेक्ट सहाय्यता’ हा मदत कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रोजेक्ट सहाय्यता हेल्पलाईनच्या माध्यमातून काही  सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. कोणतीही व्यक्ती जो डिप्रेशनमधून जात असेल तो कोणत्याही वेळी ‘24 बाय सात प्रोजेक्ट सहाय्यता’च्या प्रभारी पोलिस अधिकारी श्रीमती सुषमा पवार यांच्या मोबाईल (8830217955) क्रमांकावर मदतीसाठी फोन करू शकतो, जर असे लक्षात आले की एखादा व्यक्ती मानसिक आजारातून किंवा डिप्रेशनमधून जात आहे तर या कक्षाच्या माध्यमातून त्या व्यक्तीस प्रोफेशनल समुपदेशन उपचार पुरविण्यात येईल, त्यासाठी बीड पोलिसांना डॉ. मोहम्मद मुजाहीद (मानसोपचार तज्ञ), डॉ. अशोक मते (मानसोपचार तज्ञ) हे सहयोग करत आहेत. याव्यतिरिक्त पोलिस ठाण्यांमध्ये काही मनोरूग्ण आणि मानसिक आजार व्यक्ती येत असतात, अशा प्रकारच्या लोकांना ओेळखण्यासाठी व त्यांचे लक्षणे कशा प्रकारचे असतात यासाठी पोलिस कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले जात आहे. जेणे करून अशा लोकांना ओळखून त्यांना आरोग्य विभागाकडून उपचार दिले जातील, त्यामुळे एखादी व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या डिप्रेशन किंवा मानसिक आजारातून जात असेल तर त्या व्यक्तीने कोणत्याही प्रकारचे चुकीचे पाऊल उचलू नये, बीड पोलिस आपल्या सहाय्येसाठी 24 तास तत्पर आहेत. तुम्ही आमच्याशी बोला, आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करून तुम्हाला या कठीण प्रसंगातून निश्‍चितच बाहेर काढू असा विश्‍वास पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी व्यक्त केला आहे.

Sharing

Visitor Counter