कवयित्री सौ.सोनाली नितीन शिंदे-साळुंखे यांच्या कवितेस राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक

कवयित्री सौ.सोनाली नितीन शिंदे-साळुंखे यांच्या कवितेस राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक
अहमदनगर विशेष प्रतिनिधी(प्रा.रावसाहेब राशिनकर)
आगाज फाउंडेशन आणि आझाद ग्रुप आयोजित ऑनलाईन राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत खुल्या गटात कवयित्री सौ. सोनाली नितीन शिंदे-साळुंखे मॅडम यांच्या स्वलिखित नावात काय आहे....या कवितेला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे . ३००० रुपये रोख,सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे हे पारितोषिक आहे. सौ लीलाताई देश्चौगुले प्राथमिक विद्यामंदिर विटा,सांगली या ठिकाणी सोनाली शिंदे मॅडम या शिक्षिका म्हणून कार्यरत असून आपल्या शाळेत नेहमीच वैविध्यपूर्ण व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असल्याने विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून प्रसिद्ध आहेत.या यशोशिखरावर पोहचवण्यासाठी त्यांना आई, भाऊ स्वप्नील(psi), वहिनी व नीलची खुप लाडकी मामी- शुभा, पती-नितीनजी, मुलगा नील,बहिणीसमान असणारी जाउबाई दीप्तीताई, लाडक्या नणंदा.. पल्लूताई,पिनुताई, गौरीताई, भाऊ राहुल दादा,रमेश दादा, बेस्ट फ्रेंड-अर्चना, गायत्री, योगिता,सर्व सहकारी शिक्षक, माहेरची व सासरची सर्वच मंडळी, सर्व विद्यार्थी त्यांचे पालक, जिवलग मैत्रिणी साक्षी,कोमल,निकिता तसेच डी. एड.चा रंकाळा ग्रुप,मौलाना आझाद फाउंडेशन ग्रुप,फिरोज सर, मराठी साहित्य मंच व इनोव्हेटीव्ह टीचर्स ग्रुप चे सर्वेसर्वा काव्यरत्न प्रा.रावसाहेब राशिनकर(साहेब),देवरे सर,नरेश बागडे सर-जळगाव,व साहित्य क्षेत्रातील सर्व काव्यमंच व सर्वच साहित्यिक ग्रुपमधील सर्व सन्माननीय सदस्य व समूहप्रशासक यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.त्याचप्रमाणे सोनाली शिंदे -साळुंखे मॅडम यांची इयत्ता 10 वी तील विद्यार्थिनी कु.जानवी पतंगे हिने देखील मी जिजाऊ बोलते हे एकपात्री नाटक सादर करून या स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकावला आहे याबद्दल या सर्वांकडून व शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील सर्व मान्यवर कवी -कवयित्री यांच्याकडून या दोघींवरही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
